देश विदेश

दोन मंत्र्याचा मतदार संघ असलेल्या तालुक्यात खड्ड्यांचे साम्राज्य.

सिल्लोड तालुक्याला नेते आहे सतरा, रस्त्यांचे वाजले बारा.

सोयगाव दि. ०१ (प्रतिनिधी संदीप इंगळे) अजिंठा लेणीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पटलावर सिल्लोड तालुक्याची ओळख आहे. त्याचं बरोबर तालुक्यातील कृषी, राजकीय, सांस्कृतिक, नाट्य, सामाजिक क्षेत्रात ही सिल्लोड तालुक्याची जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. आता आणखी एका जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली आहे, ती म्हणजे तालुक्यातील खड्ड्यांचे साम्राज्य…
सिल्लोड शहरासह तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ठीक ठिकाणी रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात मुख्य महार्गासह तालुक्यातील अंर्तगत रस्त्यावरही दोन ते तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जण जखमी देखील झाले. या खड्याकंडे सार्वजनिक बांधकाम विभाग या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणे खड्ड्यातील पाण्यामुळे रस्ते शेवाळलेले आहेत. परिणामी वाहने अशा रस्त्या वरून घसरत आहे. तालुक्यात ठीक ठिकाणच्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सिल्लोड शहरासह परिसरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. त्याच बरोबर सिल्लोड शहर ते डोंगरगाव फाटा या दरम्यान मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या ठिकाणी ही दर रोज अपघात होत आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी मतदार संघात लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button