तालुक्यात भुरट्या चोऱ्या वाढल्या, कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधून घरफोडी.
वरठाण येथील घटना-१४ हजार रु. रोकड लंपास.

सोयगाव दि. २५ (प्रतिनिधी संदीप इंगळे) कुटूंबातील सदस्य नातेवाईकाकडे खासगी कार्यक्रमासाठी गेल्याची संधी साधून अज्ञातांनी, घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील वरठाण गावात दि. २५ रविवार दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे. सदर घरफोडी चा प्रकार शनिवारी रात्रीच्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध घरफोडीचा गुन्हा सोयगाव पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी सात वाजता दाखल करण्यात आला आहे.
घरात कोणीही नसल्याची संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत शनिवारी रात्रीच्या वेळी मागील दरवाजाचे कडीकोंयडा तोंडुन घरात असलेल्या गोदरेज कपाटातील रोख रक्कम चौदा हजार रुपये लंपास केले आहे. वरठाण येथील शेतकरी अशोक धनसिंग सोळंके हे जळगाव येथे नातेवाईकाकडे रविवारी कार्यक्रम असल्याने दोघे पती पत्नी शनिवारी घराला कुलूप लावून दुपारी निघून गेले घरी कुणीच नसल्याने ह्याच संधीचा फायदा घेत रात्री च्यावेळी चोरट्यांनी आधी मागील गेटवरचे आधी कुलुप तोडून आत प्रवेश करीत नंतर दरवाजाचा कडीकोयंडा तोंडुन घरात प्रवेश केला व घरात असलेले कपाटाचे लॉक तोडून कपाटातील रोख रक्कम चौदा हजार रुपये काढले. त्याच कपाटात दुसरे लॉकर चोरट्यांकडून तुटले नाही त्यामुळे तेथें असलेले लाख रुपयांचे सोन्याची दागिने सुदैवाने वाचले.
दरम्यान घराशेजारील दीपक खैरनार यांनी रविवारी दुपारी गेटचे कुलुप तोडलेले दिसल्याने तात्काळ त्यांनी बाहेरगावी असलेले अशोक सोळंके यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याठीकाणी त्यांचा पुतन्या चेतन सोळंके घराकडे आले असता चोरी झाल्याचे आढळले त्यानुसार सोयगाव पोलीसांना माहिती देण्यात आली उपनिरीक्षक रज्जाक शेख जमादार संदीप सुसर, विकास दुबेले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अशोक सोळंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक रज्जाक शेख जमादार संदीप सुसर, विकास दुबेले, राजेंद्र बर्डे, श्रीकांत तळेगावकर आदी करीत आहेत…



