नामदारांचा वरदहस्त असल्याने ठेकेदाराच्या सुपरवायझरने सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविला ठेंगा,
“कुछ भी करलो काम तो बंद होगा नहीं!”

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) उपजिल्हा रुग्णालयाचे निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या निकृष्ठ कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून चौकशी करण्यात यावी तो पर्यंत उपजिल्हा रुग्णालयाचे काम बंद करण्यात यावे या संदर्भाचे निवेदन सुज्ञ नागरिकांनी सोयगाव तहसीलदार यांच्या कडे दि. २१ बुधवार रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती. सदर कामाची बातमी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज या न्यूज प्रोटल वर दि. २२ शुक्रवार रोजी बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. के. दराडे यांनी त्यांच्या सहाय्यक अभियंता चेतन चांडोळ व सहाय्यक अभियंता मनोज चोपडे यांना उपजिल्हा रुग्णालयाचे काम बंद ठेवण्याच्या सूचना ठेकेदाराचा सुपरवायझर असलम सय्यद यास देण्यासाठी सोयगाव येथे दि. २३ शुक्रवारी पाठविले. चांडोळ व चोपडे यांनी नागरिकांच्या उपस्थितीत असलम सय्यद या सुपरवायझरला काम बंद ठेवण्याचे दराडे यांनी सांगितले आहे. तुम्ही काम बंद ठेवा असे सांगताच सुपरवायझर सहाय्यक अभियंत्यावर भडकला “कुछ भी करलो काम तो बंद होगा नहीं” असे म्हणत निरोप घेऊन आलेल्या अभियंत्यांना ठणकावले. यामुळे ठेकेदाराच्या मुजोर असलेल्या सुपरवायझरला राजकीय पाठबळ भक्कम असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दि. २२ गुरुवार व दि. २३ शुक्रवार रोजी केलेल्या पाहिनीचा अहवाल देण्यात यावा अशी नागरिकांनी विनंती केली असता अद्याप देखील अहवाल देण्यात आला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यावर शंका निर्माण होत आहे. दरम्यान मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर श्रीनिवास कातकडे यांनी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजीनगर अधिक्षक अभियंता यांना दि. २३ रोजी लेखी पत्राद्वारे सोयगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल अभिप्रायासह त्वरित सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र दक्षता व गुण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजीनगर चे अधिक्षक अभियंता हे आता किती दिवसात चौकशी करतात हे मात्र गुलदस्त्यातच आहे.



