आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अपघातात जखमी चालकास जगद् गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेची मदत…

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) अजिंठा घाटात ट्रॅकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक चा अपघात होऊन त्या अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकास जगद् गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून दि. १२ शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक दिनाजी खंदारे, आरोग्य सेविका एम. आर. खंडागळे, कैलास पाटील, निर्मलाबाई जेठे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, अजिंठा घाटात ट्रक चे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात ट्रक चालक शफीक शरीफ शहा वय ५२ वर्षे रा. खंडवा (मध्यप्रदेश) यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीज धामच्या रस्त्यावरील अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य सेवा (मो. ८८८८२६३०३०, ९२२६०९४७६६) देणाऱ्या  रुग्णवाहिकेतून चालक काशिनाथ नरोटे व दक्षता अधिकारी सुभाष काळे यांनी जखमी ट्रक चालकास सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक दिनाजी खंदारे, आरोग्य सेविका एम. आर. खंडागळे, कैलास पाटील, निर्मलाबाई जेठे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले. दरम्यान सोयगाव येथील भक्त परिवाराचे गणेश कापरे, गणेश गायकवाड, विष्णू पंडित, रामदास गवळी, हरीश पाटील, जगदीश खलसे, अशोक ढगे आदींनी मदत कार्य करीत जखमी चालक व त्यासोबत असलेल्या इसमाच्या जेवणाची व्यवस्था गणेश कापरे, राम गवळी यांनी केली होती.

Related Articles

Back to top button