आपला जिल्हामहाराष्ट्र

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात जय संघर्ष संघटना व मराठवाडा टॅक्सी युनियन चा रस्ता रोको.

पोलिसांचा चोख बंदोबस्त..

सोयगाव दि. ११ (वृत्तसेवा) जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण वाघ, तालुका अध्यक्ष राजू बडक व सोयगाव तालुका मराठवाडा टॅक्सी युनियन चे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि. ११ जानेवारी गुरुवारी संत गाडगेबाबा चौकात घोषणाबाजी करीत हिट अँड रन कायदा रद्द करावा, ड्रायव्हर सरंक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

    याबाबत सविस्तर माहिती अशी, केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायदा रद्द करावा व चालक सरंक्षण कायदा अंमलात आणावा या साठी जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटना सोयगाव व मराठवाडा टॅक्सी युनियन च्या वतीने सोयगाव येथील संत गाडगेबाबा चौकात केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायदा रद्द करावा व चालक सरंक्षण कायदा अमलात आणावा यासाठी सोयगाव येथील संत गाडगेबाबा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हिट अँड रन कायदा रद्द करावा व ड्रायव्हर सरंक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी  घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान हिट अँड रन कायदा रद्द करावा व चालक सरंक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या संदर्भाचे निवेदन सहाय्यक फौजदार दिलीप पवार यांना देण्यात आले. यावेळी जय संघर्षचे उपाध्यक्ष विष्णू गव्हाणे, तांत्रिक सल्लागार रहेमान तांबोळी, विभागप्रमुख शेख शाकिर, अमोल निकम, सुनिल निकम, शाम पाटील, शेख अख्तर, रंगनाथ एन्डोले, अनिल निकुंभ, अरुण काळे, अक्षय गव्हाणे, संदीप दुतोंडे, अविनाश देसाई, दीपक वाघ, दत्तू सोनवणे, दीपक पाटील, प्रकाश इंगळे, शेख शफिक, किरण पाटील, कासीम शेख, अर्जुन राठोड, दिनेश पाटील, ऋषिकेश गवळी, अनिल मोरे, अभय कोटेचा, विकी गाडेकर, धारा राठोड, सुनील सोहनी, विशाल राऊत, शुभम मडवे, अमोल बडगुजर, विजय गव्हाणे, दिनेश चौधरी, शेख शफीक आदींसह पिंपळगाव हरेश्वर येथील जय संघर्ष संघटनेचे व टॅक्सी युनियन चे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप पवार, बिट जमादार राजू बर्डे, गजानन दांडगे, रवींद्र तायडे, संजय सिंगल आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

“महिलांना ५०%, ७५ वर्षावरील नागरिकांना एस. टी. मध्ये मोफत प्रवास या राज्य शासनाच्या निर्णयामुळे काळीपिवळी टॅक्सी व रिक्षा चालकांच्या कटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच मोदी सरकारच्या हिट अँड रन कायद्यामुळे चालक देशोधडीला लागणार असून कुटुंबासहित आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सदरील कायदा रद्द करावा व काळीपिवळी टॅक्सी चालकांना राज्य शासनाकडून  शासकीय वाहन चालवण्यासाठी समाविष्ट करावे अन्यथा २० हजार रु महिना शासनाने द्यावा.” दिलीप शिंदे – तालुकाध्यक्ष. मराठवाडा टॅक्सी युनियन सोयगाव.

“दहा – पंधरा हजारावर नोकरी करून आपल्या कटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ड्रायव्हरांना सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा या केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्यामुळे ड्रायव्हरांसह त्यांच्या कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा कायदा रद्द करावा व ड्रायव्हरांसाठी सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल.” प्रविण वाघ – प्रदेशाध्यक्ष, जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटना महाराष्ट्र.

Related Articles

Back to top button