बस काय थांबेना, शाळा कॉलेजला जाता येईना, जरंडी व कंकराळा भागातील विद्यार्थ्यांचे त्रास

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) दरवर्षी प्रमाणे यंदाही सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना बसच्या कमतरतेमुळे शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
सोयगाव – चाळीसगाव मार्गावरील जरंडी व कंकराळा भागातील विद्यार्थ्यांनाही बसमुळे भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. जरंडी, माळेगाव, कवली, बहुलखेडा, निमंबायती, कंकराळा या सहा सात गावचे विद्यार्थी कवली, बहुलखेडा, निंबायती, जरंडी, माळेगाव – पिंप्री फाटा, कंकराळा बस स्टॉप येथे येऊन थांबलेले असतात. सकाळी 8 वाजल्यापासून याठिकाणी शकडो विद्यार्थ्यांची गर्दी झालेली असते. पण बनोटी, पाचोरा येथून फुल होऊन येणाऱ्या बस मुळे येथील मुलांना चढायला जागाचं नसते. त्यामूळे यामुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच अनेक वेळा चालक – वाहक बस वरील स्टॉपवर थांबवत सुध्दा नसतात त्यातच दि. २६ रोजी श्रावण सोमवार रोजी सकाळ सत्राची शाळा असल्याने ३४ विद्यार्थ्यांनी व ०४ विद्यार्थ्यी कंकराळा बस स्टॉप वर उभे होते. त्या दरम्यान बस क्र. एम. एच. १४ – १९८९ व एम. एच. ०११२ ह्या दोन बसेस काही वेळाच्या अंतराने कंकराळा बस स्टॉप आल्या विद्यार्थी यानी या दोन्ही बसेस वरील चालकांना बस थांबविण्याची हात दाखवून विनंती केली. मात्र दोन्ही बसेस वरील चालकांनी बस न थांबविता सरळ सोयगाव कडे बसेस जलद गतीने पळविल्या याबाबत विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांनी घडलेला प्रकार मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितला शिक्षकांनी देखील तत्परतेने सोयगाव बस आगार येथे आगार व्यवस्थापक यांना लेखी पत्र देऊन विद्यार्थ्यांना येण्या – जाण्या बसेस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. निवेदन देते वेळी कंकराळा येथील विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी यांच्यासह जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड, शिक्षक पंकज रगडे व दौलतसिंग परदेशी उपस्थित होते. दि. २६ सोमवार रोजी सदरील बसेस कंकराळा बस स्टॉपवर न थांबविता सरळ सोयगाव कडे घेऊन येणाऱ्या चालक व वाहक यांच्यावर कारवाई होते किंवा नाही हे पहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे.



