जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात घटस्थापना सुट्टीचा फलक २४ तास आधीच झळकला.
सोमवारी आरोग्य केंद्र कुलूप बंद राहण्याचे चक्क संकेत दिले.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती व साथ रोग सदृश्य स्थिती उद्भवलेली असताना जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने रविवारीच सोमवारी सुट्टी असल्याचा फतवा काढून आरोग्य केंद्र परिसरात फलकावर चिटकून दिल्याचा प्रकार रविवारी उघड झाला दरम्यान हा सुट्टीचा फलक पाहून रुग्णांनी आरोग्य यंत्रणेच्या विरोधात रोष व्यक्त करत या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राने रविवारी चक्क सोमवारी सुट्टी जाहीर असल्याने बाह्य रुग्ण विभाग बंद राहील. असा फतवा काढून सूचना फलकावर लिहून दिल्या चा प्रकार केला. हा खोडसाळपणा रुग्णांच्या लक्षात येताच रुग्णांनी आरोग्य विभागावर रोष व्यक्त करून अत्यावश्यक सेवा बंद करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी सांगितले की आरोग्य केंद्र कुलूपबंद ठेवता येणार नाही. मंगळवारी या प्रकाराची चौकशी करून कारवाई करेल असे सांगितले गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी हा प्रकार नियमबाह्य आहे. आरोग्य केंद्र कुलूप बंद राहिल्यास एक दिवसाचा वेतनात कपात करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येईल असे सांगितले.



