महाराष्ट्र राज्य महसूल सप्ताह च्या कार्यक्रमानिमित्त लावलेल्या फलकावर चूक, नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना त्रास, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

सोयगाव दि. ०५ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तहसील कार्यालयाकडून दि. ०५ महसूल सप्ताह निमित्त सोयगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमानिमित्त लावण्यात आलेल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व असे न लिहिता त्या फलकावर महारास्व झाले होते. याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले होते. केवळ महसूल सप्ताह साजरा करायचा म्हणून सोयगाव तहसील कार्यालयाकडून फार्स करण्यात आला आहे. मंगळवारी उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत लाभार्थीना विविध दाखले वाटप व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय सोयगाव, नूतन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला धनादेश तर इतर विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी सोयगाव नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीला विद्युत मीटर नाही, फर्निचर नाही तर ग्राम महसूल अधिकारी आमखेडा यांच्या नूतन इमारतीची विद्युत वाहिनीची फिटिंग देखील झालेली नसल्याने ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लोकार्पण झालेल्या इमारतीत गृह प्रवेशासाठी किती वाट पाहावी लागणार आहे. हे मात्र निरुत्तरित आहे. दरम्यान दुपारी बारा वाजता आयोजित कार्यक्रमाला अडीच तास उशीर झाल्याने लाभार्थ्यांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मंगळवार आठवडा बाजार असल्याने नागरिकांनी कामानिमित्त तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळी कमी खुर्च्या ठेवल्याने काही नागरिक खाली बसले तर काही महिला व पुरुष उभेच होते.
महसूल सप्ताहात लाभार्थ्यांना दोखेदुखी.
महसुल सप्ताह निम्मित संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, शिधापत्रिका धारक लाभार्थी, शेतकरी आत्महत्या कुटुंबातील लाभार्थी, विहीर, गाय गोठे लाभार्थी, कृषी विभाग मार्फत काही लाभार्थी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने सकाळी ११:०० वाजे. पासून बोलवण्यात आले होते. परंतु अधिकारी व कर्मचारीच दुपारी ०२:३० वा. आले. व तीन वाजता कार्यक्रमाला सुरवात होऊन साडे चार वाजे. पर्यंत लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” तसेच “अधिकाऱ्यांचा खेळ होतो व नागरिकांचा जीव जातो” अशा प्रमाणे चर्चा रंगत होती..



