आपला जिल्हा

संभाजीनगर येथे ना. संदीपान भुमरे व ना. अतुल सावे यांच्या उपस्थित होणार “पेन्शनर डे” साजरा.

संभाजीनगर येथे होणाऱ्या "पेन्शनर डे" ला दोन मंत्री व अठरा जिल्ह्याच्या प्रतिनिधी ची लाभणार उपस्थिती.

छत्रपती संभाजीनगर दि. १६ (वृत्तसेवा) दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोशिएशन तर्फे आज दि. १७ डिसेंबर रोजी छ. संभाजीनगरात टी. व्ही. सेंटर जवळील डॉ. अब्दुल कलाम संशोधन केंद्र सभागृहात नामदार अतुल सावे गृहनिर्माण मंत्री, आणि नामदार संदिपान भुमरे फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्रातील एकूण अठरा जिल्ह्याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील न तालुकाध्यक्ष यांनी निवड केलेले नऊ ऊत्कृष्ट कार्य करणारे नऊ सेवानिवृत्त कर्मचारी आणि जिल्ह्यातील जिल्हा पेन्शनर्स असोशिएशन तर्फे निवड केलेले उत्कृष्ट अकरा सेवानिवृत्त व्यक्तींना सहकुटुंब हरिश्चंद्र जोशी पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.सोयगाव तालुकाध्यक्ष विकास बाविस्कर यांनी फर्दापूर येथील भुमी अभिलेख खात्यातून सेवानिवृत्त कर्मचारी सैय्यद रब्बानी सै. अहेमद यांना यंदाचा हरिश्चंद्र जोशी पुरस्कार मिळाला असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र पेन्शनर्स असोशिएशन पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन अनुसार तसेच कार्याध्यक्ष विलास जाधव यांच्या कुशलतेने सर्व पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष यांनी केलेल्या सहकार्यामुळे आजचा भव्य दिव्य असा ‘न भुतो न भविष्यती’ कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अजूनही एक अलौकिक कौतुकास्पद कार्य म्हणजे या कार्याला येणारे सर्व सेवानिवृत्त यांचे क्षुधाशांती साठी डॉ. अरविंद देशमुख सहकोषाध्यक्ष छ. संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोशिएशन यांनी एकट्याने खर्चाची जबाबदारी उचलली आहे.

Related Articles

Back to top button