लोकशाही दिनासाठी नगर पंचायत, वनविभाग गैरहजर, कारणे दाखवा बजावणार.

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) सोयगाव तहसील कार्यालयात सोमवारी (दि. १७) आयोजित लोकशाही दिनासाठी मुख्याधिकारी नगर पंचायत सोयगाव, वन परिक्षेत्र अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या तिन्ही यंत्रणा चे अधिकारी गैरहजर आढळून आले तर सोयगाव पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषी विभाग, यासह दहा कार्यालयाचे प्रतिनिधी हजर असल्याने या यंत्रणाच्या अधिकाऱ्यांअभावी नागरिकांच्या लोकशाही दिनातील तक्रारी प्रलंबित राहिल्या आहे.
सोयगाव तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासनाच्या सूचनेनुसार लोकशाही दिन साजरा करण्यात येतो, त्यासाठी नागरिकांनी नमुना तीन मध्ये दाखल केलेल्या प्रश्नांवर उपाय काढण्यात येऊन त्या समस्या मार्गी लावण्यात येतात परंतु सोमवारी आयोजित लोकशाही दिनासाठी सोयगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी विक्रांत दराडे, वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ हे दोन्ही गैरहजर तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या ऐवजी प्रतिनिधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी तालुका आरोग्य कार्यालयाचे प्रतिनिधी हजर होते दरम्यान नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार लोकशाही दिनात आली होती यावेळी उपनिरीक्षक गजानन आरेकर, प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर यांच्यासह तीन यंत्रणाचे अधिकारी हजर होते, त्यामुळे लोकशाही दिनात गैरहजर यंत्रणेचे अधिकारी यांना तातडीने कारणे दाखवा बजावण्यात आल्या चे नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी सांगितले लोकशाही दिनातील एकही तक्रार सुटू नये अशा सूचना नायब तहसिलदार संभाजी देशमुख यांनी संबंधितांना केल्या आहे.



