आपला जिल्हामहाराष्ट्र

गुटक्यांच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक, तहसील परिसरात अस्वच्छता खर्रा.

गुटख्याच्या पिचकारी ने रंगल्या भिंती.

सोयगाव दि. १५ (वृत्तसेवा) प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास सक्त मनाई आहे. ‘थुंकू नका’ थुंकताना अढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे फलकही कार्यालयात लावण्यात येतात. तरीही अनेक शासकीय कार्यालयात अनेक जण तंबाकू, सिगरेट गुटख्याचे सेवन करून येतात, त्यामुळे कार्यालयाच्या भिंती पिचकाऱयांनी चांगल्याच रंगलेल्या असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
शासकीय कार्यालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर आणि या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारीच कार्यालयात तंबाकू, गुटखे खावून येतात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रत्येक कार्यालयात तंबाकू, सिगरेट, गुटखा संदर्भात शपथ दिली जाते. मात्र शपथ घेणारे अधिकारी व कर्मचारीच तंबाकूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतात. सोयगाव शहरासह तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास सक्त मनाई असून *थुंकू नका* थुंकताना अढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलकही कार्यालयात लावण्यात जरी आले तरी देखील अनेक शासकीय कार्यालयात अनेक जण गुटख्याचे सेवन करून येतात त्यामुळे कार्यालयाच्या भिंती पिचकार्यांनी चांगल्याच रंगलेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास आणि हे पदार्थ विक्री करणाऱ्यान वर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासनाकडून धूम्रपान करणारांवर अद्यापही कारवाई केलेली नसल्याने शासकीय इमारतींच्या भिंती व खिडक्या रंगल्या आहेत. धुम्रपान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोण कारवाई करणार हे मात्र निरूउत्तरीत आहे.

Related Articles

Back to top button