२५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी…

नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
३ फिरते विसर्जन कुंड – गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ३ ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.
स्पर्धा – पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात यआली आहे यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात १ लक्ष, ७१ हजार,५१ हजार रुपयांची तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनविणाऱ्यास २१ हजार व २१ हजार रुपयांची तसेच इतर प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.

२) साईबाबा मंदीर वडगाव – १
३) वडगाव पोलीस चौकी – १
४) दाताळा रोड,इरई नदी – २
५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २
६) तुकुम एस टी वर्कशॉप – २
७) रामाळा तलाव – ४
८) छत्रपती शिवाजी चौक – २
९) गांधी चौक – १
१०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १
११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १
१२) महाकाली प्रा.शाळा – १
१३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २
१४) झोन क्र. ३ (कार्यालय) – २
१५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती -१
निर्माल्य कलश – एकूण – १५
1) झोन क्र. १ (अ) – ५
2) झोन क्र. १ (ब) – १
3) झोन क्र. २ (अ) – ८
४) झोन क्र. ३ (ब) – १
५) झोन क्र. ३ (अ) – ३
६) झोन क्र. ३ (क) – २


