तहसीलदार, मुख्याधिकारी, इंजिनियर, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आमरण उपोषण.....

सोयगाव दि. १६ (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर गटारातील पाणी येत असून ते घाण गटारीचे पाणी ज्या मध्ये केर – कचरा, चपला – बुटे वाहत येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळच साचते त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना होत असून या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी, कर्मचारी ठेकेदाराच जबाबदार असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व गटाराचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी (दि. १७ बुधवार रोजी) सकाळी सात वाजे. पासुन नगर पंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दि. १३ शुक्रवार रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सोयगाव शहरातील जुना बाजार चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरच असलेल्या गटाराचे काम अनेक दिवसांपासून बंद – मंद चालु आहे. सदरील काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी लेखी व तोंडी विनंती करीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालय समोर लोकशाही मार्गाने उपोषणे केले. परंतु काम चांगल्या दर्जाचे व तात्काळ पुर्ण होईल असे लेखी व तोंडी आश्वासने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पगारे यांना वेळोवेळी देण्यात आले. परंतु दिलेले आश्वासने हे राजकीय दबावाने पुर्णत्वात येऊ दिले जात नसल्याचे पगारे यांनी सांगितले. सोयगाव बस स्थानक पासुन ते संपुर्ण शहरातील पावसाचे व गटाराचे पाणी जुना बाजार चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या गटारातुन जाते. पावसाळ्यात गटाराला पुराचे स्वरुप येऊन शहरातील केर – कचरा, चपला – बुटे इत्यादी घाण वाहुन येत पुतळ्याच्या समोरच घान साचते त्यातील केर-कचरा, चपला-बुटे मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होते. या संदर्भात नगर पंचायत मुख्यधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना कळवुन देखील जानिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तहसीलदार, न.प. मुख्यधिकारी, इंजिनिअर, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, पुतळ्यासमोर गटाराचे कामाचे फलक लावून तात्काळ काम पुर्ण करण्यात यावे, अन्यथा दि. १७ मंगलवार रोजी सकाळी ०७:०० वाजे. पासुन रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष अंकुश पगारे नगर पंचायत कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद प्रशासन, लाचलुचपत कार्यालय, मानवी सेवा हक्क आयोग, विभागीय पोलीस संचालक, ग्रामीण पोलीस अधिक्षक, तहसील कार्यालय सोयगाव, नगर पंचायत कार्यालय व पोलीस ठाणे सोयगाव यांना दिला आहे.



