आपला जिल्हा

शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रीय खेळाडू तथा शिवसेना तालुकाप्रमुख आबा काळे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक हर्षल (बंटी) काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर बसस्थानक येथे समाजसेवक महेश मानकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे व सौ. सुरेखा दत्तू रोकडे तसेच राहुल सोनवणे व सौ. अर्चना राहुल सोनवणे या दाम्पत्याचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपतीची महाआरती करण्यात आली.

क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा येथील कार्यालयात संस्थेचे संचालक अनिल लोखंडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी समाजसेवक दिलीप सुरडकर, रवी काळे, नगरसेवक संतोष बोडखे, राजू दुतोंडे, किशोर मापारी, सूनील काळे, भय्या चौधरी, विजय काळे, कुणाल राजपूत, ऍड योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, राहुल सोनवणे, दिपक पाटील, राम फुसे, राम सोहनी, विशाल ढेपले, विष्णू पंडित, ज्ञानेश्वर इंगळे, मयुर मनगटे, संजय मोरे, भय्यासाहेब परदेशी, संदीप सुरडकर, कृष्णा शेवाळकर, योगेश बोखरे, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, संचालक अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर आदींसह मोठया संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button