ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांची दभंग कारवाई मुळे गौणखनिज माफियांमध्ये खळबळ.
सोयगाव महसूल च्या इतिहासात सर्वात मोठी दंडात्मक कारवाई, १४०२२०० रु. ची बजावली दंडात्मक नोटीस.

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) जिल्हा परिषद लघु पाटबंधारे यांच्या अंतर्गत असलेल्या जरंडी शिवारातील चिमनापूर धरणातून जरंडी शिवारातील गट क्र. २९८ मधील प्लॉटिंग मध्ये काढण्यात आलेल्या रॉयल्टी पेक्षा जास्त मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी दि. ३१ जानेवारी रोजी जरंडी सजेचे ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांनी गट क्रमांक २९८ मधील मुरूमाचा पंचनामा करून तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला असता नय्युम शहा हाजी पाशा शहा शेख रा.परळी ता.परळी जि बीड हल्ली मुक्काम जरंडी ता.सोयगाव यास १४०२२००/- (चौदा लाख दोन हजार दोनशे रुपये मात्र) ची दंडात्मक नोटीस बजावल्याने अवैधरीत्या गौनखनिज वाहतूक करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. सोयगाव महसूल विभागाच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी दंडात्मक कारवाई झाल्याने ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांच्यासह महसूल विभागाचे तालुक्यामधून कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील चिमनापूर धरणातून २० ब्रास मुरूम वाहतूक मौजे जरंडी शिवारातील गट क्रमांक २९८ प्लॉटिंग मध्ये दि.२८ जानेवारी रोजी चालन द्वारे रक्कम रुपये १४३००/- मात्र भरणा केले असता आपण सदर ठिकाणी ३५० ते ४०० ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामा अहवाल तहसिल कार्यालयात सादर केल्याने गौनखनिज बाजारमूल्य (प्रति ब्रास १२००) म्हणजे ४०० ब्रास वजा २० ब्रास एकूण २८० ब्रास मुरुमाचे प्रति ब्रास प्रमाणे २२८०००/- रॉयल्टी रक्कम व पाच पट दंड ११४०००/- तसेच पाच टक्के भूपृष्ठ भाडे ११४००/- व दहा टक्के सरफेस रेट २२८००/- असे एकूण १४०२२००/- आपण जास्त मुरूम उत्खनन व वाहतूक केल्याचे निश्चित करून आपणाकडून वसूल का करण्यात येऊ नये? याबाबत आपला लेखी खुलासा माझे समक्ष सादर करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.उक्त मुदतीत खुलासा किंवा वरील रकमेचा भरणा न केल्यास आपले काहीही एक म्हणणे नाही असे समजून आपले मालकीचे गट क्रमांक २९८ मधील ७/१२ उतारावर बोजा नोंद करण्यात येईल व म.ज.म.अ. १९६६ चे कलमा नुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असे नय्युम शहा हाजी पाशा शहा शेख रा. परळी ता. परळी जि बीड हल्ली मुक्काम जरंडी ता. सोयगाव यांना दिलेल्या दंडात्मक नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाई मुळे तालुक्यात खळबळ उडाली असून तालुक्याचे इतिहासातील जरंडी सजेचे ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड यांच्या कर्तव्य दक्षते मुळे कारवाई झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
जरंडी शिवारातील चिमनापूर पाझर तलावातून रॉयल्टी पेक्षा जास्त मुरूम जेसीबी क्रमांक एम.एच. २० जी. के. ७१५७ च्या साहाय्याने उत्खनन करून एम. एच. १९ सी. वाय. १४७४, एम. एच. २० जी. एफ. १३४९, एम. एच. २० जीई ७३६४, एम. एच. २० इ. सी. ८०२०, एम. एच. २० जीके ६९७३, एम.एच.२० जी. के. ७९१४, या ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणारे वाहने व जरंडी ग्रामपंचायत चे आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त सुनील मंगरुळे यांनी जरंडी गावाच्या प्रथम नागरिक असलेल्या सरपंच यांना अनभिज्ञ ठेवत मुरूम वाहतूक संदर्भात तहसिलदार यांना दिलेले नाहरकत, यामुळे शासनाच्या महसुलाची विल्हेवाट लावतांना त्यांनी मदत केली आहे.वाहनांवर व ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. जेणे करून गौनखनिज माफियांकडून गौनखनिज (मुरूम) वाहतुकीची कमी ब्रास ची रॉयल्टी चालन भरून जास्त प्रमाणात मुरूम वाहतुकीवर आळा बसावा व शासनाच्या महसुलावर संगनमताने डल्ला मारला जाऊ नये. त्यामुळे जरंडी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी व वाहनावर कोण कारवाई करणार की राजाश्रय घेऊन कारवाई टाळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



