महाराष्ट्र

सोयगाव तालुक्यात वन व्यवस्थापन समित्या गायब, सात वर्षांपासून वन समित्यांचे पुनर्गठन नाही.

वरिष्ठांचे होतेय दुर्लक्ष..

सोयगाव दि. ११ (वृत्तसेवा) सोयगाव सह तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना वनविभागाने पत्रच न दिल्याने सात वर्षांपासून ग्रामीण भागातील वन समित्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अवैध वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात फोफावली आहे.
वनविभाग, महसूल, वन मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत जंगलाचे वन संवर्धन व वन संरक्षण व्हावे तसेच वनविभागाच्या सहकार्याने जंगलाची देखरेख म्हणून ग्रामस्थांसह वन विभागाने वन व्यवस्थापन समितीचे गठण केले आहे. परंतु, गेल्या सात वर्षापासून सोयगाव सह तालुक्यात अजूनही नवीन वन व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले नाही. शासन निर्णयाप्रमाणे वन व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. परंतु, सन २०१७ ते २०१८ पासून जुन्याच वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागात, काही वन व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांना वनविभागाने कोणतेही अधिकार दिलेले नसून या जुन्या वन समित्याना विश्वासात घेत नसल्याचे आरोप वन समिती अध्यक्ष यांनी केले आहे. त्यामुळे वनविभागाचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. वन व्यवस्थापन ग्रामपंचायतीच्या समिती ग्रामसभेच्या माध्यमातून वन व्यवस्थापन समितीचे गठण करते. मात्र, सात वर्षापासून आजही जुन्याच वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. नव्याने समिती गठीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत मात्र वनविभागाची उदासीनता दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button