आपला जिल्हाक्राईममहाराष्ट्र

सोयगाव पोलीस ठाण्याचे टोलेजंग इमारती मध्ये अपुरे मनुष्यबळ; कामाचा वाढतोय ताण..

सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी.

सोयगाव दि. ३० (वृत्तसेवा) ५४ गावांची हद्द असलेल्या सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून, याचा परिणाम तपास कामावर होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या आणि परिसराचा विस्तार झाला आहे. परंतु तैनात कर्मचाऱ्यांची संख्या जशीच्या तशीच राहिल्यामुळे पोलिसांवर कामकाजावर दबाव वाढला आहे.
सध्या सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये एकूण तीन अधिकारी (सहायक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक ३) आणि १९ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, होणारे गुन्हे आणि अपघात यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कर्मचारी आजारी, रजेवर किंवा साप्ताहिक सुटीवर असल्यामुळे कर्मचारी अनुपस्थित राहतात, ज्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो. गुन्हा घडल्यास आरोपींची अटक, न्यायालयीन कामकाज आणि तपास यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या परिस्थितीने पोलिस तपासकामात व्यस्त असलेले अधिकारी इतर कामे नीट पार पाडण्यास अपयशी ठरतात. त्याचबरोबर, सोयगाव पोलीस स्टेशन ची नुकतीच नव्याने टोलेजंग इमारत उभी आहे. परंतु या इमारतीत कर्मचारीच नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार कर्मचारी वाढविण्याची गरज.

सोयगाव शहरासह ग्रामीण भागातील हद्दीतील ५२ गावांच्या वाढलोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या वाढवणे आवश्यक आहे, तसेच यथायोग्य रीतीने मनुष्यबळाचे नियोजन करण्याची गरज आहे. तसेच सोयगाव तालुक्याला गेल्या तीन चार वर्षापासून पोलीस निरीक्षक नसल्याने तालुक्यातून अनेक वेळा पोलीस निरीक्षक मिळावा म्हणून लेखी निवेदन पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहे. तसेच या मागणी साठी उपोषण देखील करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button