सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक मतदार यादीवर आक्षेप सुनावणी साठी भाजप-शिवसेनेत निवडणूक आधीच जुंपली.

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) तब्बल दहा वर्षानंतर होऊ घातलेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांच्या सुनावणी साठी मंगळवारी थेट भाजपा आणि शिवसेना यांच्यात नावे समाविष्ट करण्यावरून निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी सुरू झाली आहे त्यामुळे भाजप शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे पहावयास मिळाले.
सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक साठी दि. २३ एप्रिल प्राथमिक मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर दि. ३ मे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती परंतु भाजपने यामध्ये २६१ मतदार समाविष्ट करण्या वरून या यादीवर आक्षेप घेतल्या मुळे ता ३ प्रसिध्द होणारी अंतिम मतदार यादी लांबणीवर टाकून मंगळवारी (दि. १३) या आक्षेप वर जिल्हा निबंधक हिरे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. सुनावणी साठी भाजपा कडून अल्पसंख्याक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी व शिंदे गट शिवसेनेकडून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ चे उपाध्यक्ष बबलू शेख हे होते भाजप ने घेतलेल्या आक्षेप मध्ये २६१ नावे समाविष्ट करण्यासाठी आक्षेप घेतला होता. तर शिंदे गट शिवसेनेने ही नावे समाविष्ट करू नये यासाठी आक्षेप फेटाळून लावला त्यामुळे आक्षेप दरम्यान निवडणूतिच्या आधीच भाजप व शिंदे गट शिवसेनेमध्ये जुंपली होती. त्यामुळे सोयगावात खरेदी विक्री संघा च्या निवडणूक लागू होण्याआधीच चांगलीच जुंपली आहे. दरम्यान या आक्षेप वर बुधवरी (दि. १४) निर्णय हाती येवून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भाजपचे ती नावे समाविष्ट होतात की शिंदे गट शिवसेनेचे मागणी वरून फेटाळून लावली जातात ही पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.


