महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आलेले कामे निकृष्ट दर्जाचे.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) सोयगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), पंचायत समिती कार्यालय इमारत व ग्रामीण रुग्णालय इमारतचे सुरू असलेल्या नवीन कामे निकृष्ट होत असल्याने नागरिकांनी दि. २१ बुधवार रोजी तहसीलदार मनीषा मेने यांना संबधित कामांची गुणवत्ता पथक (कॉलेटी कंट्रोल) कडून तपसणी करून व संबधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सोयगाव शहरात कोटींच्या निधी खर्चून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची कामे चालू आहेत. त्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. २६ एप्रिल २०२३ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चे भूमिपूजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांच्या सह अनेक मान्यवर यांची देखील उपस्थिती होती. त्यानंतर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम साठी ०७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असता ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दि. ११ आगस्ट २०२३ रोजी भूमिपूजन करण्यात आले. तसेच सोयगाव येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयमध्ये श्रेणीवर्धित झाल्याने रुग्णालयाच्या मुख्य इमारत साठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. तिघेही कामे निकुष्ठ दर्जाचे होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असलेल्या प्रशासकिय कामावर त्या त्या विभागाचे तांत्रिक कर्मचारी हजर राहत नसल्याचे दि. २१ बुधवार रोजी उघड झाले असल्याने होत असलेल्या निकृष्ट कामांना बांधकाम विभागाने देखील संमती दिल्याची चर्चा परिसरात होत आहे. तरी वरील सर्व कामाची (कॉलेटी कंट्रोल) गुणवत्ता पथकाकडून गुणवत्ता चाचणी करावी, सदरील कामांची अंदाजपत्रके, कामाचे फलक वरील कामावर उपलब्ध करण्यात यावे. सदरील निकृष्ट दर्जाच्या कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे नागरिकांनी लेखी निवेदन तहसिलदार यांचे कडे दिले आहे. देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी स्विकारले. देण्यात आलेल्या निवेदनावर रविंद्र काळे, मंगेश सोहनी, हर्षल काळे, राजू दुतोंडे, विजय काळे, राहुल इंगळे, दत्तू निकम, सुशिल मंडवे, दत्तू सोनवणे, सुरेश घन, प्रमोद परदेशी, पूनम परदेशी, सुनिल काळे, पवन परदेशी, राहुल श्रीखंडे, सागर चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठेकेदारांच्या माणसांची बोबडी वळली.
शहरात होणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम ठिकाणी परिसरातील काही लोकप्रतिनिधीसह गावातील नागरिक गेले असता त्या ठिकाणी माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात येत असून सोबत खडीचा बारीक कच मध्ये देखील मातीचा वापर केल्याने येथील नवीन बांधलेले भीम (खांब) अक्षरशः हाताने फुटत असल्याचे दिसून आल्याने व सदरील कामांवर अंदाजपत्रक व कामाचे फलक सुद्धा दिसून न आल्याने व कामावर बांधकाम विभागाचे तांत्रिक कर्मचारी किंवा ठेकेदार हजर नसल्याने कामावर उपस्थित ठेकेदारांच्या माणसांना विचारणा केली असता त्यांची तर अक्षरशः बोबडीच वळाली.



