आपला जिल्हामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शहरातील अश्वारूढ पुतळ्याचा शिवजयंती चा मुहूर्त हुकला-

सार्वजनिक बांधकाम विभागाने विलंब केल्यामुळें लांबणीवर.

सोयगाव  दि. १९ (वृत्तसेवा) सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंती दिनी करण्याचे नियोजन होते. परंतु मंजुरी पासून ते आतापर्यंत संबंधित विभागाने सदर नियोजित जागेची इत्यंभूत कागदपत्रे सादर न केल्याने सोमवारी (दि. १९) यंदाच्या शिवजयंती दिनीचा अश्वारूढ पुतळ्याच्या मुहूर्त हुकला आहे.

    सोयगाव शहरात नगर पंचायत च्या वतीने दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंजुरी देऊन नियोजित जागाही देऊन जागेचे मोजमाप करण्यात आले होते. परंतु अश्वारूढ पुतळ्याची नियोजित जागा शिवाजी चौक या जागेला कायद्याच्या अडचणी मुळे मागील वर्षी जागा बदल करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी नगर पंचायतला दिल्या त्यावरून नगर पंचायतीने मासिक सभा घेऊन छत्रपती शिवाजी चौकातील जागा बदलवून पंचायत समितीच्या मैदानातील गट क्र. २६९ ही जागा नियोजित केली या जागेची नोव्हेंबर २०२३ मध्ये पोलिसांनी स्थळ पाहणी करून अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे पाठवायचा होता. परंतु पुतळ्याचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे पोलिसांच्या अहवाला अभावी परवानगी न मिळाल्याने यंदाही शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रखडले आहे. त्यामुळे यंदाही सोयगाव करांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे स्वप्नभंग झाले आहे…

नामदारांनी दिलेले आश्वासन फक्त ऐकण्यासाठीच….

सोयगाव – सिल्लोड विधान सभे आमदार तथा शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री ना. अब्दुल सत्तार हे सोयगाव शहरासह तालुक्यात जालेल्या प्रत्येक कार्यक्रमांत उपस्थिताना सोयगाव बस स्थानक परिसारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आश्वासन देण्यात येत आहे. परंतु त्यांचे फक्त आश्वासनच होते असे परिसरात बोलले जात आहे. त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला सूचना देखील केल्या होत्या परंतु प्रशासनाने तुम्ही सांगा आम्ही ऐकतो असे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नामदार यांनी दिलेले आश्वासन फक्त ऐकण्यासाठीच होते कि काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

प्रशासनाची पूर्वतयारी च नव्हती

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा अनवरणाची प्रशासनाची कोणतीही पूर्वतयारी नव्हती अद्यापही अनेक प्रशासकीय त्रुटी अपूर्ण आहे त्यामुळे शहरातील अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पुन्हा एक वर्षाच्या अंतरावर ढकलले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वतयारी साठीची प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती… असे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button