आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

चौविस वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा. श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा, वरसाडे तांडा चे माजी विद्यार्थी !

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) मराठवाडा – खान्देश च्या सीमेवर असलेल्या श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा ता. पाचोरा येथील सन २००० ते २००१ वर्षी इयत्ता १० वी मध्ये शिकणारे विद्यार्थ्यांनी स्नेहमिलन सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षानंतर सॅग्रीला रिसॉर्ट मुबंई, आग्रा हायवे, पडघा कल्याण येथे उत्साहात पार पडला. सर्व वर्गमित्र चौविस वर्षानंतर एकत्र आल्याने सर्व वर्ग मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सर्व वर्गमित्र हे पाचोरा, जामनेर जि. जळगाव आणि सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आहे. तसेच पाचोरा तालुक्यातील श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे मधील पहिली ते दहावी चे माजी विद्यार्थी असून वरसाडे तांडा येथून शाळेतून इयत्ता दहावी वर्ष २०००-०१ चे गुणवंत विद्यार्थी असून त्यांनी आज रोजी विविध क्षेत्रात आपल्या शाळेचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.
सदरील वर्गमित्र व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधून पडघा कल्याण येथे एकत्रित आले व सर्व शालेय जिवनातील आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. याप्रसंगी सर्वांनी आपल्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला व भविष्यात येणाऱ्या सुखदुःख ला सर्वांनी एकत्रित रित्यासामोरे जाण्याचा निश्चय केला. आपल्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे स्मरण करून त्यांना आपल्या सर्व यशाचे श्रेय देण्यात आले.
सदरील वर्गमित्र ‘२०००/०१ क्लासमेट’ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जोडलेले आहे व ग्रुपमधील बहुतेक वर्गमित्र / मैत्रिणी वेगवेगळ्या व्यवसायात नोकरीत उद्योग धंद्यात यशस्वी झालेले असून उत्तम रित्या आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत आहे. तब्बल २४ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र – मैत्रिणी एकत्रित आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते व सर्वांचे चेहरे उत्साहाने फुलून गेले होते. याप्रसंगी विविध मनोरंजक खेळ खेळण्यात आले व आपल्यामधील ऋणानुबंध असाच कायम रहावा यासाठी ठराविक कालावधीनंतर हा स्नेहसंमेलनाचा (गेट टु गेदर) कार्यक्रम आयोजित केला जावा असा निर्धार यावेळी करण्यात आला.

Related Articles

Back to top button