गोंदेगाव येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

सोयगाव दि. ०८ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. योगेश इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार हे उपस्थित होते. दरम्यान सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी याच शाळेत उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतलेले सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झेलवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना आई-वडिलांचे संस्कार गुरुजींनी दिलेले ज्ञान व आपल्या संस्कृतीनुसार आपल्यावर घडत असलेले संस्कार या गोष्टीचा विचार करून आपल्या डोळ्यासमोर आपले उद्दिष्ट ठेवूनच आपण आपले शिक्षणातील महत्त्व जाणत आपल्या उच्च पदापर्यंत मजल गाठण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी विध्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली. दरम्यान विध्यार्थ्यांसह व्ही. खिरे, बि. ई. महालपुरे, एस.आर. दाभाडे या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार आर.एस. माळी यांनी मानले. निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



