राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी.

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) अखिल भारतीय हिंदू खाटीक समाजातर्फे राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी दि. १२ शुक्रवार रोजी राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज सोयगाव तालुका यांच्या वतीने शिवाजीनगर (आमखेडा) येथील गजानन महाराज मंदिर सभागृह येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सोयगाव आमखेडा व गलवाडा येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जिवनपटावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी तुकाराम रावलकर, अर्जुन रावळकर, संजय मंडवे, सतिष मंडवे, विष्णू लाड, ईश्वर कल्याणकर, दिपक घन, अमोल कल्यांनकर, राजू घन, तुकाराम मंडवे, गणेश कल्याणकर आदी समाज बांधव उपस्थित होते.



