पिशोर पोलीस ठाणे चे धडाकेबाज कारवाई मोटार सायकल चोरीचा गुन्हा सात दिवसात उघडकीस..

कन्नड दि. २२ (वृत्तसेवा) पिशोर पोलीस ठाणे येथे दि. १४/१२/२०२३ रोजी फिर्यादी शेख आकेब महमूद रा पिशोर यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुरनं ३८१/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पिशोर बिट अमलदार विलास सोनवणे हे करीत होते सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसातच मोटार तपास चक्र फिरवीत गुन्हेगाराला अटक करण्यात आली.
पिशोर पोलीस ठाणे येथे दि. १४ गुरुवार रोजी फिर्यादी शेख आकेब महमूद रा पिशोर यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुरनं ३८१/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास अमलदार यांनी गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजुबाजुला असलेल्या सी.सी.टि.व्ही. फुटेज वरुन (१) कडूबा नामदेव श्रीखंडे व (२) प्रितम साहेबराव श्रीखंडे दोन्ही रा. वाहेगांव ता. फुलंब्री यांना आरोपी म्हणून निष्पन्न केले. त्यानंतर नमुद आरोपीचा काल दि. २१/१२/२०२३ गुरुवार रोजी शोध घेतला असता, आरोपी कडूबा श्रीखंडे यांच्या राहते घराजवळील गोठ्यामध्ये गुन्हयातील गेला माल १५,०००/- रु. किंमतीची एच. एफ. डीलेक्स मो. सा. क्रमांक एम. एच. २० सी. एन. ६६४८ हि मिळून आली असून, ती जप्त केली आहे. तसेच प्रितम साहेबराव श्रीखंडे वय १९ वर्षे रा. वाहेगांव ता. फुलंब्री यास काल दि. २१गुरुवार रोजी अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी कडुबा नामदेव श्रीखंडे याचा शोध घेतला असता तो आज दि. २२ शुक्रवार मिळून आला त्यास आज अटक केली आहे. नमूद दोन्ही आरोपी हे घटनेच्या दिवशी गुन्हा घडवून आणण्यासाठी ज्या मोटार सायकल वर आले होते ती आरोपी कडुबा श्रीखंडे याची मो सा क्र. एम. एच. २० जि. आर. ०५९२ ही जप्त केली आहे. दोन्ही आरोपीला आज कोर्ट मध्ये हजर केले असता त्यांना जामीन वर सोडण्यात आले आहे.
सदरचा गुन्हा पिशोर पोलिस यांनी ७ दिवस मध्ये उघडकीस आणला आहे. सदर चां गुन्हा पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, कन्नड यांचे मार्गदर्शन मध्ये पिशोर पोलीस ठाणे सपोनि देविदास वाघमोडे, पिशोर बिट अमलदार विलास सोनवणे, सुनिल भिवसने, साईनाथ घुगे, कौतिक सपकाळ यांनी उघडकीस आणून कारवाई केली आहे.



