क्राईममहाराष्ट्र

देशी दारूचे ८ बॉक्स इरटिका गाडी मध्ये वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…

पिशोर पोलिस स्टेशन ची कारवाई...

कन्नड दि. २२ (वृत्तसेवा) पिशोर पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले सपोनि देविदास वाघमोडे झाल्यापासून अवैद्य धंदे वाईकांचे धाबे दणाणले आहे. पोलिस ठाणे पिशोर येथे गुप्त बातमीदाराकडून दि. २२ शुक्रवार रोजी सकाळी मिळालेल्या माहिती नुसार, सपोनि देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडे, बिट अमलदार विलास सोनवणे, किरण गंडे, सोपान डकले, संजय लगड, अन्सार पटेल, होमगार्ड देवरे व गोरे या पथकाने पिशोर वा. ०९:०० वाजता पळशी खुर्द ते पळशी बुद्रुक जाणाऱ्या रोड वरती सात लाख (७००००० रु.) किमतीची सपेद रंग असलेली ईरटीका कंपनीची कार, पासिंग क्रमांक एम. एच. १४ डी. एन. ५१२५ यामध्ये सोपान उत्तम जाधव, ४२ वर्ष, राहणार पळशी खुर्द, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे ताब्यात तेहतीस हजर सहाशे रु. (३३६०० रू) किमतीच्या देशी दारू संजीवनी संत्र्याच्या १८० एम. एल. च्या ३३६ बॉटल व ५००० रू किमतीच्या ९० एम. एल. च्या १०० बॉटल मिळून आल्या.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड कन्नड,  पिशोर पोलीस ठाणे सपोनि देविदास वाघमोडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडे, बिट अमलदार विलास सोनवणे, बिट अमलदार विलास सोनवणे, किरण गंडे, सोपान डकले, संजय लगड, अन्सार पटेल, होमगार्ड देवरे व गोरे यांनी सदर कारवाई केली. पुढील तपास पिशोर पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

Back to top button