वलांडी येथील कुटुंबीयास न्याय व मदत मिळावी..
सोयगाव तालुका हिंदु खाटीक समाज यांच्या वतीने विविध मागन्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर.

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) लातूर जिल्हा देवगी तालुक्यातील वलांडी येथील अत्यंत गरीब मागासवर्गीय अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक कुटुंबातील सहा वर्ष वयाच्या लहान मुलीवर त्याच गावातील आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी या नरा धामाने सलग पाच दिवस अत्याचार केला आहे सदर आरोपी तत्काळ फाशी देण्यात यावी व कौटुंबीयास शासनाकडून मदत मिळावी या मागणीसाठी सोयगाव तालुक्यासह फर्दापुर सावळदबारा गलवाडा तसेच तालुक्यातील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने सोमवार दुपारी सोयगाव तालुक्यात भव्य मूक मोर्चा काढून सोयगाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पिढीत व आरोपीचे घर एकामेकांच्या समोर आहेत्यामुळे पीडित कुटुंबीची सोय इतरत्र करावी अथवा पीडित कौटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे पीडित कौटुंबिक शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी पीडित बालिका च्या पुन्हा वर सणाचा शैक्षणिक आधी संपूर्ण खर्च शासनाने उचलावा सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी पीडित कौटुंबियात अल्पविनिंग चार मुली एक मुलगा असल्याने त्यांना बाल संयोग पण योजनेअंतर्गत स्पेशल केस खाली मदत देण्यात यावी संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक जातीत तेड अथवा तणाव निर्माण होणार याची काळजी प्रशासनाचा वतीने घेण्यात यावी अशा अनेक मागण्याची निवेदन सोयगाव तहसीलदार कार्यालयात मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी माजी भाजपा तालुका अध्यक्ष बद्री राठोड, हिंदू खाटीक जिल्हा संघटक शांताराम खराटे, युवा जिल्हा अध्यक्ष सतीश मांडवे, जिल्हा सचिव विष्णू लाड, जिल्हा सरचिटणीस अनिल रावळकर, बापू रावळकर, शंकर खराटे, सुनील माकोडे, अण्णा हिवाळे, दिपक घन, रवी पवार तालुक्यातील सर्व हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


