नामदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात अधिकाऱ्यांची रजाकारी.
संतप्त लोकप्रतिनिधीनी दिली तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार.

सोयगाव दि. ६ (वृत्तसेवा) शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदार संघात सोयगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे हे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी दि. ६ मंगळवारी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिल्लोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या कडे सोयगाव पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सोयगाव तालुक्याकडे नेहमीच नामदारांचे दुर्लक्ष होत असल्याने गटविकास कार्यालयातील प्रमुख असलेले प्रभारी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे हे सतत गैरहजर असतात. त्यामळे सोयगाव तालुक्यात आता अधिकाऱ्यांची देखील रजाकारी पहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी सोयगाव तहसीलदार यांच्या मार्फत प्रशासनाकडे लेखी निवेदन दि. ०६ मंगळवार रोजी दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आठवड्यातील एखादी दिवस गटविकास अधिकारी अहिरे हे पंचायत समिती सोयगाव येथे येतात. तालुक्यातीच्या ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त येणाऱ्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. कर्मचाऱ्यांवर मोठमोठ्याने ओरडतात शिविगाळ करतात हुज्जत घालतात, ग्रामस्थांशी अरेरावी करतात व तुम्हाला काय करायचे ते करा अश्या धमक्या देतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे पंचायत समिती अंतर्गत अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामस्थांना आर्थिक भुदंड सोसत चकरा माराव्या लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची कामे होत नाही. विकास कामे खोळंबलेली आहे. सदरील अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे लेखी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीचे निवेदन नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांनी स्विकारले असून निवेदनावर राहुल इंगळे, सुनिल काळे, राजू दुतोंडे, विजय काळे, दत्तू निकम, ईश्वर इंगळे, विशाल गिरी, अनिस तडवी, पूनम परदेशी, निलेश मगर, दत्तू सोनवणे, पुंडलिक कदम, दिलीप शिंदे, भागवत सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



