आपला जिल्हा

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची तहसिल कार्यालयात जयंती साजरी..

सोयगाव दि. ०७ (प्रतिनिधी) आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती तहसिल कार्यालयात साजरी करण्यात आली. दरम्यान आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे महसूल सहाय्यक निवृत्ती कापशीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महसूल सहाय्यक महेंद्र पवार, अनिल पवार, संजय नावकर, संतोष नवगिरे, पुरवठा विभागातील सुशिल कांबळे, केतन शिंदे व योगेश पगारे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button