आपला जिल्हा

सामाजिक सबलीकरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन…

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) जुना बाजार डॉ. बाबासाहेब आंबडेकर नगर येथे महाड चवदार तळे सत्याग्रह ९७ वा दिन हा “सामाजिक सबलीकरण दिन” साजरा करण्यात आला. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे. म्हणून केलेला सत्याग्रह होता. त्यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारतात साजरा केला जातो. ही आंबडेकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामाजिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, सत्याग्रह महाडचा मुक्तीसंग्राम किंवा सामाजिक क्रांती म्हणून ओळखले जाते.
यावेळी अंकुश पगारे, विजय काळे, रवींद्र काळे, राजू वानखेडे, दीपक नवगिरे, रवींद्र गंगावणे, संदीप चौधरी, गजानन ढगे, सुमित वानखेडे, मधुकर पगारे, सचिन नवगिरे, योगेश पगारे, अस्लम. शेक, आंताराम पगारे, उदय रावळकर, नितीन भोई, यांच्या सह आदी ग्रामस्त उपस्थित होते.

Related Articles

Back to top button