महाराष्ट्र

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात आमरण उपोषण.

विविध मागण्यांसाठी आज सोमवार पासून संदीप इंगळे यांचे सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

सोयगाव दि. २३ (वृत्तसेवा ) प्रशासनाला दिलेल्या विनंती व तक्रारी अर्जावर कारवाई करण्यात व अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी धोरणामुळे सोयगाव तालुक्यात सर्रासपणे रात्री बेरात्री गौनखनिज चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूलचे भरारी पथक व पोलीस प्रशासन आर्थिक व्यवहारातून कारवाई करीत नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. हा बुडणारा महसूल अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे दि. २४ सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,  सामजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांनी वनविभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन व महसूल भरारी पथक, उपविभागीय अधिकारी सिल्लोड, ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना भ्रमणध्वनीद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अवैधरीत्या वृक्षतोड, तालुक्यात होत असलेल्या गौनखनिज चोरटी वाहतूक, जरंडी ग्रामपंचायत च्या ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे यांनी गौनखनिज वाहतुकीस दिलेले नाहरकत, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंधातून कारवाईस केलेली टाळाटाळ व तहसीलदार यांनी कर्मचाऱ्यांची केलेली पाठराखण यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल सोयगाव तालुक्यात अधिकारी व माफियांच्या संगनमताने बुडविला जात आहे. या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून बुडालेला महसूल मासिक वेतनातून वसूल करण्यात यावा यासह वेळोवेळी दिलेल्या लेखी तक्रारी संदर्भात तहसीलदार यांनी काय कारवाई केली याबाबत तक्रारदारास अवगत करण्यात आले नाही. याबाबत तहसीलदार व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी दि. १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली होती. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी संबंधित प्रकरणाबाबत अद्यापही अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली नसल्याने दि. २४ सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे दि. १८ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड हे चौकशी करून कारवाई करतात की राजकीय दबावाचे बळी पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button