बिबटयाने पाडला म्हशीच्या पिल्ल्याचा फडशा, रावेरी शिवारातील घटना.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) तालुक्यातील रावेरी शिवारात बिबट्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास शेतात असलेल्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पडल्याची घटना दि. २१ गुरुवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाचे वनरक्षक शरद चेके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रावेरी शिवारातील मनोज पाटील यांच्या गट क्रमांक ३८ मधील शेतातील गोठ्यात सात जनावरे बांधलेली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने म्हशीच्या दोन महिन्याच्या पिल्ल्यावर (वगार) हल्ला चढवित फडशा पाडल्याची घटना दि. २१ गुरुवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वनविभागाचे वनरक्षक शरद चेके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी आलेल्या पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश बुखारी यांच्या पथकाने म्हशीच्या पिल्लाचे शवविच्छेदन केले.
वन्यप्राण्यांचा मृत्यू, वनप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी जनावरे किंवा हल्ल्यात मयत झालेल्या जनावरांची माहिती देण्यास वनविभाग टाळाटाळ करीत असल्याने पत्रकारांना माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. सोयगाव वनविभागाने पत्रकारांना प्रेस नोट देण्या संदर्भात उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सूचना देण्याची मागणी यांनी पत्रकारांकडून केली जात आहे.


