बोलेरोच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रोहीचा उपचारा दरम्यान मृत्यू, दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीला गाव, वनविभाग सुस्त.

सोयगाव दि. ०३ (वृत्तसेवा) सोयगाव – फर्दापूर रस्त्यावरील जंगलातांडा गावाजवळ दि. ०२ शनिवार रोजी दुपारी चार – साडे चार वाजेच्या सुमारास सोयगाव कडून फर्दापूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो वाहनाच्या समोर आलेल्या रोही धडकेत गंभीर जखमी झाला. वनविभागाच्या वाहनाचा वाहन चालक कृष्णा पोटदुखे व वनमजूर कादर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रोही ला जंगलातांडा येथील युवकांच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमा नंतर वाहनात टाकून उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश बुखारी यांनी सहकाऱ्यांच्या व वनमजूरानाच्या मदतीने शर्यतीचे प्रयत्न केले मात्र त्यांना त्यात अपयश आले, अखेर रोही ने पशुवैद्यकीय दवाखान्यात साडे सहा वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. घटनास्थळी वनविभागाचा एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे रोही ला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात उशीर झाल्याने रोही चा मृत्यू झाल्याने वन्य प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. ०२ शनिवारी दुपारी चार साडे चार वाजेच्या सुमारास सोयगाव कडून फर्दापूर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रमांक एम. एच. २१ बी. व्ही. ८९२४ या बोलेरो वाहना समोर जंगलातांडा गावाजवळ अचानक नर जातीचा रोही समोर आल्याने जोरदार धडकेत गंभीर जखमी झाला होता. रोहि चे मागील दोघे व पुढील एक असे तीन पायांचे अक्षरशः हाड मोडली होती. वनविभागाच्या वाहनावरील वाहन चालक कृष्णा पोटदुखे व वनमजूर कादर पठाण हे दोघे घटनास्थळी पोहचले मात्र वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी हजर नव्हता. जखमी रोहिला वाहनात टाकण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. दोघे शर्यतीचे प्रयत्न करीत होते मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर जंगलातांडा येथील युवकांनी या दोघ कर्मचाऱ्यांना मदत केली. तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर रोही ला वनविभागाच्या वाहनात टाकण्यात यश आले. साडे पाच वाजेच्या सुमारास रोहि ला उपचारासाठी पशू वैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश बुखारी यांनी सहकारी व वाहनचालक कृष्णा पोटदुखे, वनमजूर संजय इंगळे, रविंद्र मोरे, भिका पाटील यांच्या मदतीने रोही वर उपचारासाठी शर्यतीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. अखेर रोही ने साडे सहा वाजेच्या सुमारास पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. एकीकडे वनमजूर रोहि ला उपचारासाठी पकडून धरण्यासाठी जीवाची पर्वा करीत नव्हते. तर दवाखान्यात उपस्थिल असलेले वन कर्मचारी रोहिला न पकडता मोबाईल मध्ये फोटो काढून वरिष्ठांना माहिती देत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असल्याने रोही ला जीवाशी मुकावे लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याप्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



