आपला जिल्हामहाराष्ट्र

सोयगाव आगाराच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा प्रवाशांची धोकादायक वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष….

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगार व चाळीसगाव जि. जळगाव आगाराच्या बसगाड्या मध्ये बसगाड्या मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची धोकादायक वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यावर प्रादेशिक परिवहन विभाग छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभाग या बसगाड्या वर कार्यवाही करतात की मेहरबानी करतात असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. दरम्यान सोयगाव आगाराच्या सोयगाव-बनोटी, चाळीसगाव-जामनेर (नागद-बनोटी मार्गे), चाळीसगाव आगाराची सोयगाव मार्गे जाणारी चाळीसगाव – बुलढाणा या बसगाड्या मध्ये क्षमतेपेक्षा जास्त व चालकाच्या कॅबिन मध्ये प्रवाशी बसवून वाहतूक केली जात आहे. कॅबिन मध्ये बसलेल्या प्रवाशांमुळे चालकास वाहकाची बाजू दिसत नाही व प्रवाशी जवळ बसले असतांना मन विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या अशी प्रवाशी वाहतुक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. बसगाड्यांचे अनेक अपघात झाले असून यात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. एम. एच. २० बी. एल. २३२७ या सोयगाव आगाराच्या बसची तर अशी दुरावस्था झाली आहे. मागील बाजूचे डिकीचा दरवाजा पडण्याच्या मार्गावर असतांना देखील बसचालकाने त्याकडे दुर्लक्ष करीत बस चालवत सोयगाव येथे आणली. सुदैवाने काही अपरिहार्य दुर्घटना घडली नाही. चालक कॅबिन मध्ये प्रवाशी बसवून वाहतूक करीत असून त्यांच्यावर सोयगाव आगारप्रमुख काय कार्यवाही करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागाकडून खाजगी वाहनांवर कार्यवाही केली जाते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त जीवघेणी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर कार्यवाही करीत नसल्याने कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या प्रादेशिक परिवहन विभाग राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर कार्यवाही करणार की फक्त बघायची भूमिका घेऊन गोरगरीब प्रवाशांचा जीव टांगणीला लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास…. विद्यार्थी आल्या पावली घरी…

सोयगाव येथे जरंडी, कंकराळा येथुन प्राथमीक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत असतात बस येते वेळी बस अगोदरच जास्तीचे प्रवासी असल्याने विद्यार्थी – विद्यार्थीनी बसस्थानक येथुन आल्या पावली घरी परत जावे लागते. तसेच कंकराळा येथे तर बस चालक बस स्टॉप वर थांबवत नसल्याचेही विद्यार्थ्यांनीनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे देखील पालक वर्गातून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button