शेंदुर्णी गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान…
प्रशासनाचे अधिकारी मात्र निद्रावस्थेत......

जामनेर दि. ०३ (प्रतिनिधी संतोष चौधरी) जामनेर तालुक्यातील खांदेश मराठवाडा सीमेवर असलेल्या शेंदुर्णी गावामध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याकडे प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव जिल्ह्यात सतत च्या पावसाने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावासह परिसरात शेती पिकांसह इतरत्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावात देखील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात गाव परिसरातील नागरिकांनी नगर पंचायत व तालुका प्रशासन यांना माहिती दिली असता कोणतेही अधिकारी हे पाहणी करण्यासाठी आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पाण्याची गती इतकी होती कि परिसरात अनेक ठिकाणी वाहने देखील पाण्यात तरंगत होती. नगर पंचायत अधिकारी, तलाठी व इतर अधिकारी यांनी मुख्यालई राहणे बंधनकारक असतांना देखील गरजेच्या वेळी देखील अधिकारी येत नसल्याने नागरिकांचा शेंदुर्णी नगरपंचायत यांच्या विरोधात रोष दिसून येत आहे. यावेळी नागरिकांनी सांगितले कि, नगरपंचायत विभागाने मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. विकासाच्या नावाखाली नुसते भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. गावातील रहिवाशी परिसरात देखील नाल्या बुजून टाकण्यात आलेले असून पाण्याचा निचरा होण्यात कुठलाही मार्ग नसल्याने ते पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. मात्र प्रशासन मस्त कुंभकरणाच्या झोपेतच असल्याचे बोलले जात आहे.
आनंद नगर, केके नगर, नामदेव नगर तसेच बस स्टॅन्ड भागात लागून असलेल्या नाल्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा मुख्य प्रवाह बंद झाल्यामुळे पाणी रहिवाशी परिसरात शिरल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. पाणी जास्त प्रमाणात घरांमध्ये शिरल्याने रात्रभर घरातील पाण्याचा उपसा करावा लागला. संदीप गुरव, व्ही. डी. पाटील, संतोष महाले, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याकडे तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मुले, वयोवृद्ध नागरिक, महिला यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नसून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू यांचे देखील झालेले नुकसान यांचे पाहणी पंचनामे देखील करण्यास कुठल्याच अधिकाऱ्याला वेळ मिळाला नाही. शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्य अधिकारी तथा प्रशासक हे स्थळ सीमेवर राहत नसून नागरिकांना कुठल्याच प्रकारचे सूचना अथवा मदत झालेली दिसून येत नाही. शेंदुर्णी नगरपंचायत आपत्ती व्यवस्थापन यांचा कुठलाही उपयोग नागरिकांना झालेला दिसून येत नाही.


