जळगाव – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिल्लोड जवळ ट्रॅफिक जाम. कार्यकर्त्यांचा जीवघेणा प्रवास…

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दि. २९ मंगळवारी तीन वाजेपर्यंत मुदत असल्याने शक्ती प्रदर्शन करीत अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान ग्रामीण भागातून आलेल्या वाहनांमुळे छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावरील सिल्लोड जवळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यावेळी पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाची चर्चा शहरात रंगली होती.
या बाबत सविस्तर वृत्त असे सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि. २९ मंगळवार रोजी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्त्यांच्या जिवाशी खेळ करीत शक्ती प्रदर्शन करीत अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान ग्रामीण भागातून आलेल्या वाहनांमधुन प्रवास करतांना सर्व वाहतूक नियम गुंडाळून ठेवत कार्यकर्ते वाहणाच्या वरती तर काही वाहणाना लटकत मोठी कसरत करीत प्रवास करीत होते. इतर वेळी मंगरूळ फाटा येथे नेहमीच काही वाहणाची वाहतुक पोलीस तपासणी करीत असतात मात्र निवडणुक आचारसंहिता असतांना देखील आज वाहणावरील कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल असल्याने पोलिस देखील आपले काही करु शकत नाही अशी चर्चा वाहणातील कार्यकर्ते करीत होते. पोलीस प्रशासनानी देखील हतबल होत बघ्याची भूमिका स्विकारली. यावेळी पोलीस प्रशासनावर आचारसंहिता असतांना देखील कोणाचा दबाव होता हे मात्र निरुत्तर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावरील सिल्लोड जवळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यावेळी पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाची चर्चा शहरात रंगली होती.



