महाराष्ट्र

वसुबारसनिमित्त अंजनाई गोशाळा येथे गोवत्स पूजन सोहळा उत्साहात साजरा…

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) आश्विन वद्य द्वादशी अर्था‌त वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. त्यामुळे सर्वत्र दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस गाय वासराच्या पूजनाने साजरा केला जातो.  त्यानिमीत्ताने क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गो-शाळा आमखेडा येथे वसू बारस निमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश कापरे व सौ. इंदूबाई गणेश कापरे सपत्नीक यांच्या शुभहस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी गॊमातांना गोड घास भरविण्यात आला. याप्रसंगी गुरू सुनिल जोशी, दिलीप मचे, गजानन ढगे, बापू ठाकरे, अनिता ठाकरे, दिलीप बागुल, रवी ठाकरे, इलामसिंग चव्हाण, गौरव पवार, केतन शिंदे, अथर्व इंगळे आदी उपस्थित होते. अंजनाई गोशाळेचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव दिलीप शिंदे, संचालक सौ. उर्मिला इंगळे, सौ. पद्मा शिंदे, सौ. मीना गाडेकर, सौ. रुपाली लोखंडे, अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान उपस्थित बहुसंख्य माता भगिनी, गो भक्त मंडळी यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Back to top button