क्राईममहाराष्ट्र

महसूल व पोलीस आपण दोघे शासकीय भाऊ, गौणखनिजाचा माल मिळून मिसळून खाऊ !

महसूल व पोलीस प्रशासनाचे गौणखनिज माफियांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष.

सोयगाव दि. ०८ (प्रतिनिधी) महसूल व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दि. ०७ शुक्रवारी रात्री मुरूम व वाळू ची चोरटी वाहतूक सर्रास सुरू होती. रात्री चक्क सोयगाव पोलीस ठाण्यासमोरूनच चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर गेले. मात्र पोलिसांसह महसुलच्या भरारी पथकाने कार्यवाही केली नाही. अर्ध्या तासाच्या अंतराने वेताळवाडी येथे रात्री चोरटी वाळूने भरलेले डंपर खाली करण्यात आले. दि. ०८ शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सोयगाव – फर्दापूर रस्त्यावरील सावरखेडा फाट्याजवळ मुरूम व याच रस्त्यावर असलेल्या वाघूर नदीवरील पुलाच्या बाजूला अवैधरीत्या वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक सुरू आहे. पोलीस, महसुल व गौनखनिज माफियांच्या आर्थिक हितसंबंधामुळे गौनखनिजाची भरदिवसा व रात्री चोरटी वाहतूक सर्रास सुरू आहे. शासनाच्या महसुलाची होणारी लूट थांबविण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी भरारी पथक स्थापन करून कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान शुक्रवारी व शनिवारी गौनखनिज चोरटी वाहतूक सर्रास होती. तहसीलदार भरारी पथक प्रमुख यांना लोकेशन देऊन देखील कार्यवाही करण्यासाठी आले नाही. तर वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर चक्क सोयगाव पोलीस ठाण्यासमोरून गेले मात्र कुणीही त्यास थांबवून विचारपूस केली नाही. शहरासह परिसरात चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर हे बिनधास्त चालत असल्याने महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी त्या डंपर वर कार्यवाही करणार नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सोयगाव तहसीलदार, भरारी पथक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस प्रशासन यांचे अधिकारी व कर्मचारी जनतेच्या पैशावर पगार, सुख सुविधा भोगत आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या शासकीय यंत्रणा मात्र गौनखनिज माफियांची चाकरी करीत महसूल व पोलीस आपण दोघे शासकीय भाऊ असल्याचे दाखवत, गौणखनिजाचा माल मिळून मिसळून खात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button