विद्यमान तहसीलदारांच्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार…
सोयगाव तहसील कार्यालयाच्या कारभाराकडे विभागीय आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज...

सोयगाव दि. १४ (प्रतिनिधी) श्रीमती मनीषा मेने यांनी सोयगाव तहसिल कार्यालयाचा पदभार स्विकारला तेंव्हा पासून तहसिल कार्यालय हे गोरगरीब जनतेच्या त्रासाचे माहेर घर बनले आहे. अपवाद मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांची कामे व्हावी यासाठी सोयगाव येथील नॅशनल हायस्कुलचा लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याने चक्क तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या पेशकाराच्या खुर्चीचा ताबा घेऊन काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्या कर्मचाऱ्यास संगणकाचा पासवर्ड, ओटीपी कुणी दिला यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पालकमंत्री यांच्या दबावाला बळी पडत तहसीलदार मनीषा मेने यांनी अद्यापही कार्यवाही केली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जनता जनार्दन ही मालक असते परंतु तहसीलदार या पालकमंत्र्यांच्या हातचे बावले झाल्याची चर्चा तहसिल परिसरात सुरू होती. तहसीलदार मनीषा मेने यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याने कर्मचारी अधिकारी हे कार्यालयात उशिरा येत आहे. तर काही कर्मचारी अधिकारी ये-जा करीत असल्याने कार्यालयात दीड दोन तास उशिरा येत आहे. ग्रामीण भागातून तहसिल कार्यालयात कामानिमित्त सकाळी उपाशी पोटी आलेल्या सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे वाळू, रेशन, गौनखनिज या लाजखोरीच्या प्रकरणात तहसिल कार्यालय बदनाम झाले आहे. ग्रामीण भागातून दिव्यांग, महिला व वयोवृद्ध हे दि. १० मंगळवारी शिधापत्रिका घेण्यासाठी मोठ्या संख्येने तहसिल कार्यालयात आल्या होत्या. एक ते दीड वर्षांपासून चकरा मारीत आहे. परंतु एकही अधिकारी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुरवठा विभागात एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हता पुरवठा विभागात शुकशुकाट पहायला मिळाला होता. तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभाराकडे विभागीय आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी चर्चा तहसील कार्यालयात कामा निम्मित ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांमधून व्यक्त केली जात होती.
पालकमंत्री यांच्या सोयगाव येथील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने सोयगाव तहसील निवडणूक विभागातील संगनकाचा ताबा घेऊन कामे केल्याचा धक्कादायक प्रकार दि. २८ आगस्ट ला उघडकीस आला होता. त्याबाबत ची बातमी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रोटल द्वारे प्रकाशित केली होती. मात्र जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उप विभागीय अधिकारी लतीफ पठाण व सोयगाव तहसीलदार श्रीमती मनीषा मेने यांनी संबधितांची अद्यापही चौकशी करून कारवाई केलेली नाही. संबधित अधिकारी हे ना. अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबावाला बळी पडत असल्याची चर्चा सोयगाव परिसरात सुरु होती. जिल्हाधिकारी करणार कि नाही असा संभ्रम तालुक्यातील जनतेत निर्माण झाला आहे.



