दिव्यांगांनी भिक मांगो आंदोलन करून तहसीलदार यांना दिवाळीची मिठाई भेट..
दिव्यांगांतर्फे तहसील कार्यालय येथे तीन तास भिक मांगो आंदोलन.
सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) संजय गांधी योजनेचे मानधन देण्यात यावे, दिव्यांगांना अंतोदय शिधाप्रतिका देण्यात याव्या व संजय गांधी योजना समितीवर दिव्यांग व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी या मागण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे भिक मांगो आंदोलन करण्यात आले. भिक मागून जमा झालेले १४८ रुपयाची मिठाई आणून तहसीलदार मोहनलाल हारणे यांना मिठाई देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. ०७ मंगळावर रोजी लेखी निवेदनाद्वारे ठिय्या आंदोलन, भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे दि. १३ सोमवार रोजी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष संदीप इंगळे यांच्या नेतृत्वात संजय गांधी योजना व श्रावण बाळ सेवा योजनेचे थकीत मानधन देण्यात यावे, दिव्यांगाना अंतोदय शिधाप्रतिका देण्यात याव्या व संजय गांधी समिती वर दिव्यांग व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी ठिय्या आंदोलन व भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिधाप्रतिके साठी दाखल करण्यात आलेल्या अर्जा नुसार महिना अखेर पर्यंत ऑनलाईन करून शिधाप्रतिका देण्यात येतील व संजय गांधी योजना व श्रावण बाळ सेवा योजनेचे थकीत मानधन व संजय गांधी समिती स्थापन करून दिव्यांग व्यक्तीची नेमणूक संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल अशा लेखी आश्वासनाचे पत्र नायब तहसीलदार विठ्ठल जाधव व पुरवठा अधिकारी नाना मोरे यांनी दिल्यावर तीन तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयात विविध कामाकरिता येणाऱ्या अनेक व्यक्तींनी महसूल प्रशासनासाठी मागण्यात आलेल्या भिक मध्ये एक, दोन रुपया देत प्रशासना विषयी नाराजी व्यक्त केली. सात दिवस अगोदर निवेदन देऊन देखील तहसीलदार मोहनलाल हारणे हे दिव्यांगांच्या आंदोलन दरम्यान गैरहजर होते. दरम्यान भिके पोटी १४८ रुपये जमा झाले असतांना दिव्यांगांनी त्यापैशांची मिठाई तहसीलदार यांना नायब तहसीलदार यांच्या हस्ते पाठविण्यात आली.
महिना अखेर मागण्या पूर्ण न झाल्यास या पेशा तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याच्या इशारा तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनात तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, महिला तालुकाध्यक्ष मंगलाताई जोहरे, सचिव अनिल लोखंडे, शहराध्यक्ष यासीन बेग, संजय मिसाळ, विनोद पगारे, सुरेश वाघ, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर भिवसने, वाल्मिक इंगळे, सोमनाथ जगताप यांच्यासह शेकडो दिव्यांग उपस्थित होते.


