आपला जिल्हामहाराष्ट्र

राजकीय दबावाला बळी पडून निकृष्ठ कामाकडे जि. प. शाखा अभियंत्याचे सोयीस्कर दुर्लक्ष.

अजब अधिकाऱ्याचा गजब कारभार.

सोयगाव दि. ३ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथील शिवाजीनगर भागात आमदार निधीतून निकृष्ठ दर्जाच्या करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक दत्तू निकम यांनी दि. २८ डिसेंम्बर रोजी जि. प. बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्याकडे पुराव्यासहित लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र जि. प. बांधकाम विभागाकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. दि. ३१ बुधवारी जि. प. बांधकाम शाखा अभियंता राजेश राजगुरू हे सिमेंट रस्त्याची पाहणी व मोजमाप करण्यासाठी गलवाडा (अ) गावात दाखल झाले. सिमेंट रस्त्याचे मोजमाप करताना अभियंत्यास नागरिकांसह महिलांनी चांगलेच धारेवर धरले होते. संबंधित ठेकेदारास कामाचे देयक देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक महिला वारंवार करीत होत्या.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गलवाडा (अ) येथील शिवाजीनगरात काही दोन, तीन महिन्यांपूर्वी आमदार निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात येत होते. या संदर्भात स्थानिक नागरिक दत्तू निकम यांनी जि. प. बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्याकडे दि. २८ जानेवारी रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. आमदार निधीतून शिवाजीनगरात सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम सुरू असून शाखा अभियंता राजेश राजगुरू हे राजकीय दबावाला बळी पडत असून त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त निकृष्ठ दर्जाचे कामे चालू आहेत. शिवाजीनगर भागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचा पुरावा देत क्वालिट कंट्रोल (गुणवत्ता तपासणी) कडून चौकशी करण्यात यावी तो पर्यंत संबंधित ठेकेदारास कामाचे देयक देण्यात येऊ नये असे जि. प. बांधकाम उपविभाग सिल्लोड यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सदरील काम हे माजी जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून राजकीय पाठबळामुळे माती मिश्रित खडीचा बारीक फफुटा, मातीमिश्रित वाळू चा सर्रास वापर करीत निकृष्ट दर्जाचे काम करीत होता. वारंवार चांगले काम करण्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. कामाबाबत जि. प. बांधकाम शाखा अभियंता राजेश राजगुरू यांना देखील याबाबत कळविण्यात आले होते. राजेश राजगुरू हे राजकीय दबावाला बळी पडीत काम पूर्ण होईपर्यंत कामाकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत असतात यामुळे गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. रस्त्याच्या झालेल्या कामास अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले असून शासनाच्या लाखो रुपयांचा निधी ठेकेदार व अभियंत्यांच्या घशात जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान जि. प. बांधकाम शाखा अभियंता राजेश राजगुरू यांनी मोजमाप केल्याशिवाय ठेकेदारास कामाचे देयक अदा केले जात नाही. गलवाडा (अ) येथील शिवाजीनगर येथे निकृष्ठ दर्जाचे झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशीची तक्रार जि. प. बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र उप अभियंत्याकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. या बाबत शाखा अभियंता राजेश राजगुरू यांना आम्ह्चे प्रतिनिधीनी  भ्रमणध्वनीद्वारे उपअभियंता सिल्लोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे अजब अधिकाऱ्याचा गजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

जि. प. बांधकाम शाखा अभियंता राजेश राजगुरू यांना शिवाजीनगर येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे याबाबत माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ठेकेदाराने घाईगडबडीत काम पूर्ण केले. सदरील कामाची पुराव्यासहित तक्रार केली असता जि. प. बांधकाम विभागाचा एकही अधिकारी चौकशीला आला नाही.तक्रारीची चौकशी न करता  शाखा अभियंता राजेश राजगुरू यांनी सिमेंट रस्त्याचे मोजमाप केले. उपअभियंता यांनी क्वालिट कंट्रोल कडून चौकशी करावी. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय  ठेकेदारास कामाचे बिल देण्यात येऊ नये. याप्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. दत्तू निकम, सामाजिक कार्यकर्ते गलवाडा (अ).

Related Articles

Back to top button