महाराष्ट्र

सोयगाव तालुक्यात दोन मंडळात अतिवृष्टी, पुरांच्या पाण्यात पिके वाहून गेली घोसला, नांदगाव, तिडका,बोरमाळ, शिवारात नुकसान.

सोयगाव दि.  १६ (वृत्तसेवा) तालुक्यातील जरंडी आणि बनोटी या दोन मंडळात सोमवारी सकाळी सात वाजेपासून ते साडे आठ वाजेपर्यंत दीड तास ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा पाऊस झाला या ढगफुटी सदृश पावसाने घोसला, नांदगाव, नांदगाव तांडा, तिडका, जंगली कोठे, बोरमाळ तांडा, या पाच गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसाने तासभर थैमान घातले यासह बनोटी, गोंदेगाव मंडळातील ४३ गावांमध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे. दरम्यान घोसला येथील खटकाळ नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरून घोसला, नांदगाव, शिवारातील शेती खरडून वाहून गेली असून काही शेतकऱ्यांचे कपाशीच्या पिके पुरात वाहून गेले तिडका बोरमाळ, जंगली कोठे शिवरतही कपाशी, मका, तूर, सोयाबीन, केळी ही पिके आडवी पडली आहे. दरम्यान खटकाळी नदीला पूर आल्या मुळे सोयगाव – चाळीसगाव वाहतूक ठप्प होती.
बनोटी मंडळातील ४३ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कपाशीचे पिके आडवी झाली आहेत, काही भागात शेतात गुडघा भर पाणी साचले आहे. बनोटी, गोंदेगाव, हनुमंत खेडा या ठिकाणी कपाशी, मक्याच्या पिकांचे आडवी होऊन नुकसान झाले आहे दरम्यान ढगफुटी भागात महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानी चे पंचनामे हाती घेतले होते.

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची पाहणी

दरम्यान ढगफुटी झालेल्या गावांना नुकसानी ची पाहणी करण्यासाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जळगाव जिल्हा भाजपचे मधुकर पाटील यांच्यासह पाचोरा कृषी आणि महसूल विभागाने घोसला, तिडका या ढगफुटी सदृश पावसाने झालेल्या नुकसानी ची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला होता. बनोटी शिवारातील कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गुडघ्यावर पाण्यात बनोटी, गोंदेगाव शिवारातील पिके पाण्यात बुडाली असून या मंडळात ४३ गावांना अतिवृष्टी चा फटका बसला आहे.

Related Articles

Back to top button