श्री. गजानन महाराज प्रगट दिनानिम्मिताने विविध कार्यक्रमांचे आयोजन….
भाविकांनी महाप्रसाद, शोभायात्रा इ. कार्यक्रमात सहभाग घ्यावा.

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) आधुनिक युगातील महान संत योगिराज श्री. गजानन महाराज (शेगांव) यांचा १४६ वा प्रगट दिन आणि शिवाजीनगर आमखेडा परिसरातील सदगुरु श्री. गजानन महाराज मंदिराचा १५ वा वर्धापन दिन या संयुक्त सोहळ्या निमित्त मंदिर परिसरात भक्तिमय कार्यक्रमांचे दि. १ मार्च पासून श्री. गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर आमखेडा येथे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दि. १ मार्च शुक्रवारी पहाटे श्री. गजानन महाराजांच्या मूर्तीस मंगलस्नान अभिषेक आरती, श्री. संत दासगणू महाराज विरचित श्री. गजानन विजय ग्रंथ मुखोदगत पारायण वाचन जयंतराव मराठे कराड हे सकाळी ०९.०० ते १२.०० व दुपारी ०२.०० ते पारायण संपेपर्यंत, संध्याकाळी ०७:०० वाजता नैमित्तिक आरती व श्री. गजानन बावन्नी पठण, रात्री ०८.३० ते १०.३० वाजता श्री. सुनील जी. देशपांडे अकोला यांचे निरूपण, विषय – सांभाळा गुरुराया भाग क्र. एक. दि. ०२ मार्च शनिवारी पहाटे श्री. महाराजांच्या मूर्तीस मंगलस्नान अभिषेक आरती, सकाळी ०९.०० ते ११.०० श्री. देशपांडे अकोला यांचे निरूपण विषय – सांभाळा गुरुराया भाग क्र. दोन, दुपारी ०३.०० वाजता श्रीं. ची पालखी शोभायात्रा निघेल, संध्याकाळी ०७.०० वाजता नैमित्तिक आरती, श्री. गजानन बावन्नी पठण, रात्री ०९.०० वाजता श्री. गजानन महाराज बावन्नी परिवार सिल्लोड यांची भजन संध्या. दि. ०३ मार्च रविवारी श्री. चे प्रगट दिनांतर्गत पहाटे श्री. महाराजांना मंगलस्नान, मंत्रोक्त अभिषेक औक्षण, आरती, अथर्वशीर्ष पठण, दुपारी १२ वाजता श्रीं. ची महाआरती, श्री. गजानन बावन्नी पठण सामुदायिक नामजप, दुपारी १२:३० पासून महाप्रसाद व दुपारी एक वाजता रामदेव बाबा भजनी मंडळ जामठी यांची भजन सेवा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी ग्रंथ पारायण, नामस्मरण, महाप्रसाद, शोभायात्रा इत्यादी कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. गजानन महाराज मंदिर समिती शिवाजीनगर आमखेडा यांनी केले आहे.



