आपला जिल्हा

प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब पाचपुते यांची निवड.

सोयगाव दि. २६ (वृत्तसेवा) प्रहार दिव्यांग संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी दादासाहेब पाचपुते यांची निवड मोठ्या उत्साहात पार पडली. गंगापूर, कन्नड, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांचा समावेश असलेल्या या पदासाठी लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार सर्व दिव्यांग बांधवांना विश्वासात घेऊन चार तालुक्यांसाठी जिल्हा अध्यक्ष ची निवड करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार घेण्यात निवड प्रक्रियेसाठी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, जालना जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे व जालना जिल्हाध्यक्ष रवींद्र अंभोरे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

मतदानाची पारदर्शक व शिस्तबद्ध प्रक्रिया पार पडून शेवटी दादासाहेब पाचपुते यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले.

दादासाहेब पाचपुते यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी व प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून ते नेहमी लढा देतील. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. वातावरणात जल्लोष व उत्साहाचे वातावरण होते. पाचपुते यांच्या निवडीमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Back to top button