महाराष्ट्र

सत्तारांच्या वक्तव्याने हिंदू समाज नाराज, वांगी बु. चे लोन सोयगावात, कार्यकर्त्यांनी केल्या साड्या जमा, शहरातील प्रकार–

सोयगाव दि. १० (प्रतिनिधी) सिल्लोड तालुक्यातील वांगी बु. येथील समस्त हिंदू गावकऱ्यांनी ना. सत्तार यांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी केली. यासंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना साड्या जाळणारे बोगस लोक आहेत असे म्हटले होते. यामुळे शहरातील भवानी नगर भागातील महिलांनी साड्याची होळी करण्यासाठी रस्त्यावर टाकल्या याची माहिती मिळताच शहरप्रमुख संतोष बोडखे, नगरपंचायत गटनेता अक्षय काळे, रमेश गव्हांडे यांनी तात्काळ धाव घेत साड्या जमा केल्याचा धक्कादायक प्रकार दि. १० गुरुवारी घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिल्लोड तालुक्यातील वांगी बु. येथे सत्तारांकडून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान नवरात्रोत्सव सुरू असल्याने सिल्लोड तालुक्यातील वांगी बु. येथे नवरात्र उत्सवा दरम्यान मंदिरावर हिंदू बांधवांकडून महाराजांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील महिलांनी पायात चप्पल घालून मंदिरात प्रवेश करीत गोंधळ घातला होता. शाब्दिक चकमकी दरम्यान मुस्लिम महिलांनी हिंदू महिलांना उद्देशून मुसलमानांच्या साड्या कशा चालतात असे म्हटल्याने संतप्त वांगी करांनी सत्तारांकडून महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्यांची होळी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटने संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सत्तार म्हणाले कि, अरे यार ते लोक बोगस आहेत असे म्हटल्याने हिंदू समाज संतप्त झाला आहे. याचे पडसाद सोयगावात पाहायला मिळाले. भवानीनगर मध्ये सत्तारांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची होळी करण्यासाठी एक एक महिला साडी रस्त्यावर टाकीत होत्या. याची माहिती सत्तारांच्या कार्यकर्त्यांना कळताच शहरप्रमुख संतोष बोडखे, नगरपंचायत गटनेता अक्षय काळे, रमेश गव्हांडे यांनी साड्या जमा करून सत्तारांच्या कार्यालयात जमा केल्या. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील लोन ग्रामीण भागात पाहायला मिळणार का अशी चर्चा शहरात सुरू होती.

Related Articles

Back to top button