ड्राय-डे असतांना परिसरात तळीरामाना दारू मिळते कशी?
अवैद्य देशीदारू व गावठी दारूची सर्रास विक्री.

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील सोयगाव पोलीस ठाण्या अंतर्गत जरंडी, निंबायती, बहुलखेडा येथे अवैद्य देशीदारू व गावठी दारूच्या सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक पोलीस प्रशासन कारवाही करीत नसल्याने दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सोयगाव तालुक्यातील जरंडी, निंबायती, बहुलखेडा परिसरात अवैध देशी दारू व गावठी दारू कोणाच्या आशीर्वादाने सर्रास सुरु आहे मात्र गुलदस्त्यातच आहे. यामुळे अनेक गोरगरीबांचे संसार रस्त्यावर आले आहे. तर तरुण वर्ग आर्थिक, मानसिक त्रासामुळे व्यसनाधिंतेकडे वळला असून तरुण पिढीच आयुष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थीवर्ग देखील गुटख्याच्या आहारी गेला आहे. बनोटी दूरक्षेत्र अंतर्गत अवैद्य रित्या देशी, विदेशी दारू सह गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जरंडी, निंबायती, बहुलखेडा हद्दीतील अवैध देशीदारू, गावठी दारू चालकांवर पोलीस प्रशासनाचे आर्थिक संबंध असल्यामुळे कारवाई होत नाही.
या तिघही गावातील धार्मिक स्थळे, प्राथमिक शाळा परिसर, व मुख्य रस्त्यावर खुलेआम अवैध देशीदारू व गावठी दारू व्यवसाय राजेरोसपणे सुरु असल्याने शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. जरंडी एकाच गावात सहा ते सात ठिकाणी अवैद्य दारू विक्री होत आहे. तर लहान मुलांवर दुषपरिनाम होत आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष देऊन जरंडी, निंबायती, बहुलखेडा या ठिकाणी होत असलेली अवैद्य देशीदारू व गावठी दारू बंद करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनास कारवाई करण्यासंदर्भात सूचना करण्याची मागणी जोर धरत आहे.
ड्राय-डे असो कि सणवार, अवैद्य दारू विक्री सरूच.
शासनाने जरी ड्राय-डे असो की सणवार तरीही शासनाच्या आदेशाला पायंदळी तुडवत काही आर्थीक संबधांमुळे तळीरामना देशीदारू व गावठी दारूची जरंडी, निंबायती बहुलखेडा परिसरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दि. १७ बुधवार रोजी ड्राय – डे असल्याने शासनमान्य दुकानात ७५ रुपये किमत असलेली दारू बॉटल ८० ते ९० रुपयाला तर अवैद्य विक्री करणाऱ्यांकडे १०० ते ११० रुपयाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून आले. सोयगाव शहरात तहसील कार्यालयाच्या समोर तर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या हाक्केच्या अंतरावर शासनमान्य दुकानातून ड्राय – डे च्या दिवशी सुध्दा दुकाने चालू ठेवून चढ्या भावाने विक्री केली जात होती. मुख्य रस्त्यालगत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे निद्रावस्थेत गेल्याचे दिसून येत होते. तसेच तालुक्यासह सिल्लोड तालुक्यातील इतर गावात मोटार सायकल द्वारे दारूचे खोके पाठविले जातात. व अवैद्य विक्री मोठ्या प्रमाणात होत असते या कडे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन कारवाई करणार कि नाही हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.



