महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे.

मुंबई दि. २७ (वृत्तसेवा) भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भ या भागांत पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राने याबाबत सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
२७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र व कोकण : २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
विदर्भ : २७ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस; काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
मराठवाडा : २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस; २७ व २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
नागरिकांसाठी सूचना :
अधिकृत सूचनांचे पालन करावे.
धोकादायक भागात जाणे टाळावे.
पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.
विजा पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.
जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आवश्यक असल्यास स्थानिक निवारा केंद्राचा वापर करावा.
पूरस्थितीत नद्यांच्या पुलांवरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
आपत्कालीन संपर्क क्रमांक :- राज्यातील धरणगाव, बीड, परभणी, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, रायगड, पालघर, ठाणे, सातारा, लातूर या जिल्ह्यांसाठी स्थानिक आपत्कालीन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्य स्तरावर मंत्रालय यातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत असून नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२७९६२, ०२२-२२०२७३२९, ०२२-२२०२५१६३.



