बदलापुरच्या त्या घटनेच्या निषेधार्थ सोयगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मुकमोर्चा…

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) बदलापूर मधील त्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ दि. २२ गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढून शासनाचा व त्या दुर्दैवी घटनेचा निषेध केला. यावेळी मुकमोर्चा समारोप च्या मार्गदर्शनात सांगितले सरकारने लाडक्या बहिणींना दिलेल्या त्या पंधराशे रुपयांची किंमत काय असा सवाल थेट राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करून लाडक्या बहिणींच्या मुली जर सुरक्षित नसतील तर त्या पंधराशे रुपयात काय जहर आणून खायचे काय असा प्रश्न मोर्चा च्या माध्यमातून शासनाला उपस्थित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनीनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या मूक मोर्चा व्यापारी गल्ली, नारळी बाग भागातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला याठिकाणी समारोपाच्या प्रसंगी सहभागी महाविकास आघाडीच्या उपस्थित मान्यवरा यांमान्यवरांनी मुलींच्या आई वडिलांना ही उपदेश देत मोबाईल चे एक बटन सुद्धा घातक ठरते त्यासाठी आई वडिलांनिही लक्ष द्यावे राज्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बदलापूरच्या त्या अमानुष घटनेचा निषेध करून महिलांच्या अत्याचाराचा तपास करणारच नाही असे सरकारने एकदाचे जाहीर करून टाका अन्यथा महिलांना सुरक्षा द्या लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणीची गरज भासू लागली आहे. असे ही त्यांनी सांगितले यावेळी महाविकास आघाडीचे विठ्ठल बदर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख (उद्धव ठाकरे गट,) दिलीप मचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष डॉ. इंद्रजित सोळुंके, शहराध्यक्ष रविंद्र काळे तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजू काळे, रघुनाथ चव्हाण, शहराध्यक्ष दिनेश हजारी, रविंद्र काटोले, भरत पगारे, विजय काळे, भैया जुनघरे, सुधाकर सोहनी, अजय नेरपगारे, बबन रोकडे, प्रा. ज्योती स्वामी, निर्मला बोराडे, कमलबाई पगारे, आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. शिरीष पवार आदींची मुकमोर्चा मध्ये उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडी च्या वतीने विठ्ठल बदर पाटील, रवींद्र काळे यांनी तालुका प्रशासनाला निषेधाचे निवेदन दिले आहे.



