क्राईममहाराष्ट्र

चोरटी गौण खनिज वाहतूक प्रकरणी सामजिक कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना “आंखे तो खोलो स्वामी……..” म्हणायची वेळ.

सोयगाव दि. २३ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या चोरटी गौण खनिज वाहतुकी वर आर्थिक व्यवहारातून सोयगाव महसूल व पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना “आंखे तो खोलो स्वामी….” अशी म्हणण्याची वेळ सामाजिक कार्यकर्त्यांवर आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी खरोखरच डोळे उघडतात की जैसे थे ठेऊन तहसीलदार व त्यांचे सहकारी यांना अभय देतात यावर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी सोयगाव परिसरासह तालुक्यात दिवस, रात्री बेरात्री चोरटी गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. सोयगाव पोलीस ठाण्यासमोरून चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर बिनधास्तपणे वाहतूक करीत असल्याची घटना ताजी असताना दि. २३ रविवारी १२:०९ वाजता चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर तब्बल दहा ते पंधरा मिनिटे महसुलच्या नाकावर टिच्चून तहसिल कार्यालयासमोर उभा असतांना देखील कारवाई करण्यात आली नाही. तहसिल कार्यालयाच्या मुख्यप्रवेश द्वाराजवळ तीन मोटार सायकल उभ्या होत्या. कार्यालयात हे लोक काय करीत होते? त्यात कर्मचारी होते की दुसरेच बाहेरचे लोक होती? हे मात्र कळू शकले नाही. सोयगाव वनपरिक्षेत्राच्या वनविभागाच्या हद्दीतुन देखील गेल्या आठवडा भरापासून वनविभागाची परवानगी न घेता रात्री गौण खनिज वाहतूक केली जात आहे. यामुळे वनसंपदेवर परिणाम होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र वनविभाग, महसूल व पोलीस आपण तिघे भाऊ कारवाई करण्या ऐवजी मिळून वाटून खाऊ असा प्रकार सोयगाव तालुक्यात सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का दुर्लक्ष केले जाते हे मात्र निरुत्तरीत आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्त्याला “आंखे तो खोलो स्वामी….” म्हणायची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी डोळे उघडणार की नाही याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button