आपला जिल्हामहाराष्ट्र

बस स्थानक परिसरात स्वच्छतागृहा अभावी प्रचंड गैरसोय…

ज्येष्ठ नागरिक, महिलावर्गाची कुचंबणा...

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्याचे शहर असलेल्या व सदैव गजबजलेली बाजारपेठ असलेल्या सोयगाव बस स्थानक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांची विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्गाची गैरसोय होत आहे.

सोयगाव तहसील कार्यालय सह इतर महसूल कार्यालये, राष्ट्रीयीकृत, सहकारी, जिल्हा बॅंका, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय, हायस्कूल, कॉलेज असल्याने दररोज हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी येतात, तसेच सोयगाव शहराला लागून लोण्याचे भैरवनाथ मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिर, जग प्रसिद्ध अजिंठा लेणी, वाडी किल्ला, घटोत्कच लेणी, यासह प्रसिद्ध स्थळे असल्याने भाविकांसह प्रेक्षकांची मोठी वर्दळ असते. त्यातच सोयगाव बाजारपेठेस परिसरातील ४० ते ४५ गावांसह संपूर्ण तालुक्याचा संपर्क येत असल्याने नोकरवर्ग, खासगी डॉक्‍टरांकडे येणारे रुग्ण, बाजार करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने येत असतात; परंतु गावात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असते. यापूर्वी बस स्थानक परिसरात तोडके – मोडके  स्वच्छतागृह उपलब्ध होते. परंतु त्याच ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून नगर पंचायत कार्यालय सोयगाव निधीतून स्वच्छतागृहाचे बांधकाम करीत आहे. नगर पंचायत व संबधित ठेकेदार हे मनमानी करून स्वच्छतागृहाचे काम गेल्या दिड ते दोन वर्षा पासून शासनाचे नियम धाब्यावर बसवून धिमे गतीने करीत आहे. त्यातच चालू असलेले काम अतिशय निकृष्ट पद्धतीने देखील करण्यात येत आहे. याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न परिसरात चर्चिला जात आहे. सदरील स्वच्छतागृहाचे काम तात्काळ करण्यात येईल अशामुळे जुने मोडके – तोडके बस स्थानक परिसरातील अत्यावश्‍यक असणारे स्वच्छतागृह पाडले गेले. परिणामी पर्यायी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नसल्याने सोयगाव बाजारपेठेत मागील दोन वर्षांपासून व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांची, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनीसह महिलावर्गाची कुचंबणा होत असल्याचे दिसून येत आहे.

आशा, आरोग्य सेवीकांवर कुष्ठ, क्षयरुग्ण शोधण्याची जबाबदारी.

नगरपंचायत समोर उभे असलेले फिरते स्वच्छतागृह….

सद्यःस्थितीत महिलांसाठी पुसेगावात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला, तसेच शाळकरी विद्यार्थिनींना ओळखीच्या व्यक्तीकडे विनंती करून वैयक्तिक शौचालयाचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे, तर काहींना ती सुविधाही मिळत नसल्यामुळे मोठी अडचण होत आहे. ज्येष्ठ नागरिक बस स्थानक येथे येतात. मात्र, स्वच्छतागृहाच्या गैरसोयीमुळे हैराण झालेले दिसून येतात. नैसर्गिक विधीचा वेग रोखल्याने पोटांच्या आजारांना बळी पडावे लागते. नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन, बस स्थानकाजवळ आणि मुख्य बाजारपेठेमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नगर पंचायत समोर अनेक दिवसापासून फिरते स्वच्छतागृह उभे करून नगर पंचायत ची शोभा वाढवत आहे. मात्र ते फिरते स्वच्छतागृह नगर पंचायत कार्यालय बस स्थानक परिसरात उभे करण्याचे देखील कष्ठ घेत नाही त्यामुळे शहरात आलेल्या नागरिकांसह महिलांची कुचंबना होत आहे. सोयगाव नगर पंचायत ही शिंदे गटाचे ना. अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असून जो पर्यंत नामदार आदेश देत नाही तो पर्यंत फिरते स्वच्छतागृह वापरल्या जात नसल्याची चर्चा देखील बस स्थानक परिसरात रंगत आहे.

“सोयगाव बस स्थानक येथे बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृह व मुतारी चे काम गेल्या दिड ते दोन वर्षापासून ठेकेदार मनमानी पद्धतीने धीमे गतीने करीत आहे. त्यामुळे सोयगाव बस स्थानक परिसरात महिला व शालेय विद्यार्थीनीना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायत समोर देखावा म्हणून उभे करण्यात आलेले फिरते स्वच्छतागृहाचा वापर करून ते बस स्थानक येथे उभे केले तर त्याचा उपयोग होईल. त्यामुळे तात्काळ सकारात्मक विचार करून बस स्थानक परिसरात सौचालय व मुतारी चे योग्य पद्धतीने बांधकाम होत नाही तो पर्यंत फिरते स्वच्छतागृहाचा बस स्थानक परिसरात उभे करून जेष्ठ नागरिकांसह महिलावर्गाला होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी.” संदीप इंगळे, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन सोयगाव तालुकाध्यक्ष.

Related Articles

Back to top button