प्रधानमंत्री आवास योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी लाभार्थी परेशान….

सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाचा पाचवा हप्ता गेल्या पाच वर्षांपासून न मिळाल्याने संतप्त घरकुल लाभार्थ्यांनी दि. ३१ बुधवारी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. घरकुलाचा पाचवा हप्ता तत्काळ मिळावा या मागणीचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी बबन तडवी यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव शहरात प्रधानमंत्री आवास योजना सुरुवात होऊन पाच वर्षे पूर्ण झाले असून आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम पूर्ण केलेले आहे. घरकुल लाभार्थ्यांना चार हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. सोयगाव शहरामधील पाचव्या चेक च्या अपेक्षेने काही लाभार्थ्यांनी बँक मार्फत व काहींनी खाजगी प्रकारचे कर्ज घेतलेले आहे. सदर चेक न मिळाल्याने लाभार्थी अडचणीत सापडला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे कर्ज कसे फेडावे यामुळे लाभार्थी चिंताग्रस्त झालेले आहे. त्यामुळे सदरील हप्त्याचा चेक तात्काळ देण्यात यावा असे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक जुळवणूक करून आपल्या स्वप्नातील घर उभे केले आहे. घर बांधण्यासाठी घेतलेले कर्जाची परतफेड त्यातच दुष्काळ परिस्थितीमुळे कर्ज फेडण्यासाठी जीवनाची पराकाष्टा करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कामधंद्यांचा फारमोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकुलाचा पाचवा हप्ता तात्काळ मिळाला तर थोडेफार कर्जाचे ओझे कमी होणार असल्याचे लाभार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटला असून देखील लाभार्थ्यांना घरकुलाचा पाचवा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे घरकुलाचा पाचवा हप्ता मिळणेसाठी किती संघर्ष करावा लागणार हे मात्र अनुत्तरीत आहे.


